व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी

मावळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 22, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
In the backdrop of elections police administration in Maval is on alert mode vehicles are being checked

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तब्बल आठ ते नऊ वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांमध्ये नेत्यांसह नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशात या निवडणुका शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडाव्या यासाठी शासकीय यंत्रणा देखील सज्ज झाल्या असून पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक काळात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कामशेत पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून पोलीस निरिक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविली जात आहे. यानुसार कामशेत शहरात आणि कामशेत पोलीस ठाणे हद्दीत जागोजागी चेक पॉइंट बनवून तिथे प्रत्येक संशयीत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

काळ्या काचा असलेल्या वाहनांवर विशेष लक्ष –
सदर मोहीमेत काळ्या काचा असलेल्या, काळ्या फिल्म लावलेल्या आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या चारचाकी वाहनांवर विशेष लक्ष देऊन त्यांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनामार्फत ही विशेष काळजी घेतली जात आहे.

कामशेत शहर हे अतिसंवेदनशील क्रमवारीत येते. यामुळे पोलिस प्रशासनाने अवैध गतिविधीवर बारीक लक्ष ठेवल्याचे दिसून येत आहे. मावळात व कामशेत शहरात इतर मार्गाने अमली पदार्थांचे साठे येऊ नयेत, याकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे.

कामशेत शहरामधून नाणे मावळ, पवनमावळ, आंदरमावळ, पुणे व मुंबई या ठिकाणांकडे जाण्यासाठी मार्ग असल्याने शहरात गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याकरिता प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. नागरिकांनी देखील आपल्या परिसरात जर काही संशयास्पद वाहने, हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम


dainik maval jahirat

Previous Post

‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने

Next Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक २०२६ : मावळात भाजपा-शिवसेना पक्षाची युती, अधिकृत उमेदवार जाहीर – पाहा संपूर्ण यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 BJP-Shiv Sena alliance in Maval official candidates announced

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक २०२६ : मावळात भाजपा-शिवसेना पक्षाची युती, अधिकृत उमेदवार जाहीर - पाहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.