व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !

येत्या सोमवारी १३ मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Lok-Sabha-elections-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


येत्या सोमवारी १३ मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. सुमारे १२ हजार मतदार अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रावर एकूण ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर ८३ सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान यंत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले जात आहे. ( 33 Maval Lok Sabha Constituency Election Poll Dated 13th May 2024 Administration ready )

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपुर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

पनवेल विधानसभा –
यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५ लाख ९१ हजार ३९८ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख १७ हजार ९६ पुरूष, २ लाख ७४ हजार २३१ महिला तर ७१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच पनवेल मतदारसंघात ५४४ मतदान केंद्रे असून याठिकाणी २ हजार ४०४ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ४६ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ८६ एसटी बसेस, १५ मिनी बसेस, २० जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशा १२५ वाहनांची याठिकाणी आवश्यकता असणार आहे.

कर्जत-खालापूर विधानसभा –
कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ९ हजार २०८ मतदार असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार २८६ पुरूष, १ लाख ५३ हजार ९१७ महिला तर ५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३३९ मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ५०० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार २२० बॅलेट युनिट, ४६७ कंट्रोल युनिट आणि ४९१ व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी ४७ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४३ एसटी बसेस, २१ मिनी बसेस, ८ जीप, ६ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

उरण विधानसभा –
उरण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख १९ हजार ३११ मतदार असून त्यामध्ये १ लाख ६० हजार ७०९ पुरूष, १ लाख ५८ हजार ५९३ महिला तर ९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३४४ मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ५२० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार २३८ बॅलेट युनिट, ४७४ कंट्रोल युनिट आणि ४९८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ६० वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४१ एसटी बसेस, २२ मिनी बसेस, २८ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर आणि १ बोट अशी ९६ वाहनांची आवश्यकता भासणार आहे.

मावळ विधानसभा –
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ७३ हजार ४०८ मतदार असून त्यामध्ये १ लाख ९१ हजार ७०२ पुरूष, १ लाख ८१ हजार ६९३ महिला तर १३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३९० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ७३२ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार ४०४ बॅलेट युनिट, ५५३ कंट्रोल युनिट आणि ५९२ व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. यासाठी ४५ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४९ एसटी बसेस, २७ मिनी बसेस, २० जीप, ३ ईव्हीएम कंटेनर अशी ९९ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

चिंचवड विधानसभा –
चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ लाख १८ हजार २४५ मतदार असून त्यामध्ये ३ लाख २७ हजार ९६१ पुरूष, २ लाख ९० हजार २३९ महिला तर ४५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ५४९ मतदान केंद्रे असून याठिकाणी २ हजार ४३६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ९७६ बॅलेट युनिट, ७७९ कंट्रोल युनिट आणि ८३९ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ४८ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. १०२ पीएमपीएमएल बसेस, २० मिनी बसेस, १६ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी १४२ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पिंपरी विधानसभा –
पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ७३ हजार ४४८ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ९६ हजार ४३० पुरूष, १ लाख ७६ हजार ९८८ महिला तर ३० तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ४०० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ७७६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या केंद्रांवर १ हजार ४४० बॅलेट युनिट, ५६८ कंट्रोल युनिट आणि ६०८ व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ४५ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ७३ पीएमपीएमएल बसेस, १ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मतदान व मतदानोत्तर प्रक्रियेच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता पिण्याचे पाणी, औषधे, मंडप उभारणी, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सुविधांसह इतर तांत्रिक बाबींचीही पुर्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदार केंद्रांची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर असलेले क्युआर कोड स्कॅन करून मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचेही दीपक सिंगला यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– “श्रीरंग बारणेंना आता मतदार स्विकारायला तयार नाहीत.. त्यांचे मित्र पक्ष देखील त्यांना स्विकारायला तयार नाहीत” । Maval Lok Sabha
– ‘महाराष्ट्रात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटलांना दिली..त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा’ – उद्धव ठाकरे
– मावळमध्ये धडाडणार अजितदादांची तोफ ! श्रीरंग बारणेंसाठी आज घेणार 2 सभा, पहिली सभा कामशेतमध्ये तर दुसरी पिंपरीत


Previous Post

नागरिकांनो कुठल्याही दबावाला बळी न पडता मतदान करा ! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा लोकसभा मतदानाआधी रूट मार्च

Next Post

मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
photos and videos are taken while voting

मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.