व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“श्रीरंग बारणेंना आता मतदार स्विकारायला तयार नाहीत.. त्यांचे मित्र पक्ष देखील त्यांना स्विकारायला तयार नाहीत” । Maval Lok Sabha

'श्रीरंग बारणें यांना आता कोणीही मतदार स्विकारायला तयार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मनात परिवर्तनाची लाट तयार झाली आहे.'

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 9, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval Lok Sabha Mauli Dabhade Shrirang Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘श्रीरंग बारणें यांना आता कोणीही मतदार स्विकारायला तयार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मनात परिवर्तनाची लाट तयार झाली आहे. आता कोणी कितीही आव आणला तरी बारणे यांच्यावरील निष्क्रिय हा कलंक पुसला जाणार नाही. कारण तो सलग दहा वर्ष लागला आहे. मित्र पक्ष देखील त्यांना स्विकारायला तयार नाहीत. मात्र केंद्रातील भूत मानेवर असल्यामुळे प्रचार करावा लागतोय, अशी मित्र पक्षांची परिस्थिती आहे.’ अशा शब्दांत सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते लोणावळा येथे मविआच्या मेळाव्यात बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोणावळा येथे नुकताच महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी माऊली दाभाडे बोलत होते. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, गुरव समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, लोणावळा शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगरसेवक सुनील इंगुळकर, युवक नेते फिरोज बागवान, तळेगाव शहर अध्यक्ष नंदकुमार कोतूळकर, ज्येष्ठ नेते दादा भोंगाडे, अल्पसंख्यक अध्यक्ष जकिर शेख, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, माजी नगराध्यक्ष राजू गवळी व सुधीर शिर्के, शुभम जोशी, सेवादलाचे अध्यक्ष सुनील मोगरे, लक्ष्मण दाभाडे, माजी युवक अध्यक्ष दत्ता दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Constituency Election Mauli Dabhade criticism of Shrirang Barane )

माऊली दाभाडे बोलताना म्हणाले, ‘भारत देश हा लोकशाही देश आहे. येथे प्रत्येकाला चांगलं वाईट निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मागील दहा वर्ष मावळ लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी बारणे यांना दिली. आम्ही सुध्दा त्यांचा प्रचार केला होता. मात्र त्यांनी दहा वर्षात एकाही कामाची चुणूक दाखवली नाही. असा नामधारी खासदार काय कामाचा आहे. त्या विरुध्द महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका झाली. त्यांचे वडील यांनी त्या भागात औद्योगिक क्रांती घडवली अशी खानदानी परंपरा असलेला उमेदवार असल्याने यावेळी मतदारांनी भावनेवर आधारित नाहीत तर मेरिटवर आधारित व स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारा उमेदवार लोकसभेत पाठवण्याचा संकल्प केला असल्याने मावळातून किमान 50 हजार मतांचे मताधिक्य संजोग वाघेरे यांना मिळवून देऊ,’ असा विश्वास दाभाडे यांनी व्यक्त केला.

‘महायुतीमधील राष्ट्रवादीने खासदारांनी मावळ मतदारसंघात विकासाचे काय दिवे लावले ते सांगा, अशी विचारणा काही दिवसांपूर्वी उघडपणे केली होती. तर भाजपाने बारणे नावाचा निष्क्रिय उमेदवार बदला, आम्ही काम करणार नाही, अशी थेट भूमिका मांडली होती. तरी देखील युतीच्या डोक्यावर मिऱ्या वाटत पुन्हा निष्क्रियतेचा ठपका असलेल्या बारणे यांना मावळात उमेदवारी शिंदे यांनी दिली,’ असा जोरदार हल्लाबोल माऊली दाभाडे यांनी लोणावळ्यात मेळाव्यात बोलताना केला आहे.

अधिक वाचा –
– संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरणार मैदानात ! Maval Lok Sabha
– रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट । Talegaon Dabhade
– विविध धार्मिक कार्यक्रमांसह संत शिरोमणी श्री गोरोबाकाका यांची 707 वी पुण्यतिथी तळेगाव येथे साजरी । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

‘महाराष्ट्रात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटलांना दिली..त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा’ – उद्धव ठाकरे

Next Post

तळेगाव दाभाडे शहरातील श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदन उटी सोहळा, कार्यक्रमाचे यंदा 24वे वर्ष, पाहा वेळापत्रक । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chandan Ooty Mahadev Temple talegaon

तळेगाव दाभाडे शहरातील श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदन उटी सोहळा, कार्यक्रमाचे यंदा 24वे वर्ष, पाहा वेळापत्रक । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.