व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरातील श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदन उटी सोहळा, कार्यक्रमाचे यंदा 24वे वर्ष, पाहा वेळापत्रक । Talegaon Dabhade

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय मुहूर्तावर शुक्रवारी, दिनांक 10 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील श्री बनेश्वर मंदिरात श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा आणि एकतारी भजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 9, 2024
in लोकल, शहर
Chandan Ooty Mahadev Temple talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय मुहूर्तावर शुक्रवारी, दिनांक 10 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील श्री बनेश्वर मंदिरात श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा आणि एकतारी भजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंदन उटी सोहळ्याचे हे 24 वे वर्ष असून या वर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी 5 किलो चंदनाचा लेप महादेवाच्या शिवलिंगाला लावून तसेच विविध प्रकारच्या 100 किलो फुलांची आकर्षक सजावट करून भव्य असा चंदन उटी सोहळा साजरा करणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्री बनेश्वर सेवा मंडळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी या मुहूर्तावर हा सोहळा आयोजीत केला जातो. अक्षय्य तृतीया हा एक पवित्र मुहूर्त आहे. या दिवशी केलेल्या शुभारंभाचे फल हे अक्षय्य राहते. साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त असलेला हा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया होय. याच दिवशी भगवान विष्णुंचा सहावा अवतार असेलल्या भगवान परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी व्यासमुनिंनी श्री गणेशाला महाभारत सांगुन त्याच्याकडुन लेखन करवुन घेतले. अनादीकाळापासुन हा सण साजरा केला जातोय. ( Chandan Ooty Ceremony at Baneshwar Mahadev Temple in Talegaon Dabhade )

महाभारत, स्कंदपुराण, भविष्यपुराण आदी ग्रथांत या सणाचा उल्लेख आढळतो. या तिथीला दानधर्म, होमहवन, परोपकार, पुजा, भजन केले तर ते कधीही क्षयाला जात नाही. म्हणुन या दिवशी दानधर्म व नविन कार्याला सुरूवात केली जाते. चैत्र व वैशाख या दोन महिन्यांतला अक्षय तृतीया हा दुवा आहे. वैशाखाच्या झळा असह्य होत असताना अक्षय तृतीयेचा गाभा लक्षात घेऊन पाण्याचे कलश दान केले जातात व मंदिरातील मुर्तीना चंदनाचा लेप लाऊन शीतल करतात.

चंदन उटी सोहळा – सकाळी 11 ते सायं 06 वाजेपर्यंत
नित्य महाआरती – सायं 07 वाजता
महाप्रसाद – रात्री 7.30 वाजता
एकतारी भजन सोहळा – रात्री 07 ते 10 पर्यंत
तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– मावळमध्ये धडाडणार अजितदादांची तोफ ! श्रीरंग बारणेंसाठी आज घेणार 2 सभा, पहिली सभा कामशेतमध्ये तर दुसरी पिंपरीत
– संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरणार मैदानात ! Maval Lok Sabha
– रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

“श्रीरंग बारणेंना आता मतदार स्विकारायला तयार नाहीत.. त्यांचे मित्र पक्ष देखील त्यांना स्विकारायला तयार नाहीत” । Maval Lok Sabha

Next Post

मावळ लोकसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचा पाठींबा जाहीर । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Waghere Maval

मावळ लोकसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचा पाठींबा जाहीर । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.