पुणे शहरात आयोजीत 34व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ( Pune Festival 2022 ) बालगंधर्व रंगमंदीर ( Balgandharva Rang Mandir ) येथे 15 नामवंत कीर्तनकारांनी आणि साथीदारांनी नारदीय कीर्तन महोत्सव ( Naradiya Kirtan Mahotsav ) सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी याचे संयोजन केले होते.
या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलचे ( Pune Festival ) अध्यक्ष सुरेश कलमाडी ( Suresh Kalmadi ) यांनी दिप प्रज्वलन करून केले. या प्रसंगी मीरा कलमाडी, जेष्ठ नेते उल्हास पवार, श्रध्देय असे श्री हरी कीर्तनोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि कीर्तनकार ह.भ.प. कीर्तनकलानिधी रामचंद्रबुवा भिडे आणि ह.भ.प. डॉ. नंदिनीताई भूषण पाटील ,पं रामदास पळसुले पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जयश्री देशपांडे, प्रेमा कुलकर्णी मंचावर उपस्थित होते. तसेच पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा – अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पुरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
या वेळी माननीय सुरेश कलमाडी, तालभूषण पं. नचिकेत अनंत मेहेंदळे, पं रामदास पळसुले यांचा शाल आणि पुणेरी पगडी देऊन पारंपारिक पद्धतीने गौरव करण्यात आला. मीरा कलमाडी यांनाही यावेळी पारंपारिक साडी देऊन गौरवण्यात आले. कीर्तन कुलगुरू ह.भ.प.कै डॉ. अनंतबुवा मेहेंदळे यांना आणि तीर्थरूप कै भालचंद्र खळदकर यांना समर्पित या कीर्तन महोत्सवाची सुरुवात सामुदायिक नमनाने झाली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘देस’ रागात नमन जयजय रामकृष्ण हरि आणि खमाज रागात बालकृष्ण चरणी हे कीर्तनकारांनी सादर करून उपस्थितांना आनंद दिला. प्रारंभी ह.भ.प. विकासबुवा दिग्रसकर यांनी गोवंश रक्षणाचे महत्त्व सांगणारे आख्यान सादर केले. मुळात अंत:करणात भक्तीचे अधिष्ठान असावे, हे महिलांच्या चक्राकार आख्यान सादरीकरण या अनोख्या कीर्तनमांडणीने रसिकांना सांगीतले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा हा तुकोबांचा अभंग मांडताना ह.भ.प तन्मयी मेहेंदळे यांनी हंसाध्वनी रागांच्या छटा दाखवत गणेश पंचारत्नं आणि वातापी गणपती भजेहम हे गणेशाचे गीत सादर केले. ‘तंबुरी मिटिदवा’ हा भक्तपुरंदरदांसाच्या सिंधु भैरवीतील कानडी अभंग पेश करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. भक्तीला महाराष्ट्र कर्नाटक सीमांचा प्रश्न येत नाही, हे विठ्ठलानेच आपल्या कृतीने दाखवले ते येथे जाणवले.
ह.भ.प धनदा गदगकर यांनी ‘विष्णुदास’ आख्यानातून हेच अद्वैताचेविचार विष्णुमुखातून व्यक्त झाले आहेत, असे मांडले. ह.भ.प. सुषमा गोखले यांनी भक्तीचा जिव्हाळा हा विचार देणार्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मातोश्री “कनकाई” यांच्या भक्ती मार्गाचे आचरण ते भाद्रप्राप्ती हा विचार त्यांच्या कीर्तन अख्यानातून मांडला.
हेही वाचा – वडिलांच्या त्रासाला कंटाळून घरातून पळालेल्या कुसगावमधल्या दोघी बहिणी ‘इथे’ सापडल्या
भक्ती ही गुरु शिवाय संरक्षीत होत नाही. समर्थ रामदास स्वामी आणि गुरुभक्त मधुकर यांच्याभक्ती महात्म्यातुन ह.भ.प दया कुलकर्णी यांनी नेमक्या शब्दात विचार मांडला. राष्ट्रीय कीर्तन विषयाची अनुभूती ह. भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी क्रांतीवीर हुतात्मा “अनंत कान्हेरे” यांच्या आख्यानातून श्रोत्यांना मिळवून दिली. अशाप्रकारे देशभक्तीचा जिव्हाळा जाणणाऱ्या या देवाच्या पुतळ्याला कृतज्ञता पूर्वक वंदन करून भारतमाता की जय, वंदेमातरमच्या जयघोषाने सभागृह दणाणून सोडले.
तथा चैतन्यमयी वातावरणातच ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी यांनी कीर्तन सुरू केले. संगीतमय स्वरमय अशा पद्धतीने वेदांत विचार विवेचन कीर्तनातून मांडून नारदीय कीर्तन परंपरेचा मानबिंदू ह.भ.प श्रेयसबुवांनी गाठला. राग मल्हाराने त्यांनी जणू पावसाची बरसात प्रेक्षकांवर केली. हेची दान देगा देवा आणि आरती सामूहीक पद्धतीने सादर करून सर्व कीर्तनकारांनी श्रोत्यांना कीर्तन भक्तीचा लाभ दिला.
हेही वाचा – लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल
यावेळी पेटीची साथ वेदिता काचरे आणि पं. उदय शहापूरकर यांनी केली तबला साथीची दमदार बाजू ह.भ.प. मंदार गोखले आणि ओंकार जोशी यांनी सांभाळली. झांजेची साथ ह.भ.प. आनंदी कऱ्हाडकर, सूत्रसंचालन ह.भ.प. भैरवी कऱ्हाडकर यांनी केले. महोत्सवासाठी एमआयटी युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी हे प्रायोजक होते. तसेच या कार्यक्रमात स्वागत आणि विशेष संयोजन सहाय्य वैदेही जोशी आणि मधुरा नातू यांचे लाभले. ( 34th Pune Festival 2022 Naradiya Kirtan Mahotsav )