Dainik Maval News : वडगाव नगर पंचायतीत सध्या प्रशासकीय राज सुरू असून या प्रशासकीय कालावधीत सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28 फेब्रुवारी) मंजूर करण्यात आला. एकूण 98 कोटी 79 लाख 33 हजार 87 रुपयांचा व 11 लाख 67 हजार 501 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासकीय ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.
वडगाव नगर पंचायतीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात येत्या आर्थिक वर्षांत विविध विकासकामे मार्गी लावण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा योजना, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, महिला-बालकांसाठी योजना आदींचा समावेश आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये :
1. वडगाव नगरपंचायतसाठी एकूण रक्कम 40,32,08,00 रुपयेची नवीन वाढीव मंजूर पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करणे.
2. वडगांव नगरपंचायतला सांडपाणी व मलनिसारणसाठी CSAP अंतर्गत एकुण 5.5 MLD चा एकुण 16.97 रुपये कोटीसाठी साठी तांत्रिक मान्यता मंजूर असून सदर प्रकल्प ठिकाणी सोलार प्लांट उभारणे आहे. सदरील प्रक्रिया जलद गतीने पार पाडणे.
3. वडगांव नगरपंचायत पाणी पुरवठा योजनांची सुधारणात्मक (Reforms Work).
4. स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प अहवाल (DPR) ची अंमलबजावणी करणे.
5. वडगाव शहरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरा Installation करणे.
6. दिव्यांग तसेच दुर्बल घटक कल्याण निधीची तरतूद
7. महिला व बालिकांकरिता स्वसंरक्षण,योगा,आरोग्य, इ.चे विशेष प्रशिक्षण देणार
8. कर्मचारी यांचा अपघात विमा त्यासाठी भरीव तरतूद
9. स्वच्छता अभियान / माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तरतूद
10. तलाव नाले व विहिर संवर्धन व सुशोभीकरण अंतर्गत तरतूद
11. नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी साठी भरीव तरतूद
12. केंद्रस्तरीय भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज अनुदान अंतर्गत 7.5 कोटी रुपयाचे शॉपिंग सेंटर बांधणे.
13. सन 2025-26 मध्ये वडगाव नगरपंचायतीचे उत्पन्न वाढीकरिता शासकीय आदेशाप्रमाणे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा