व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

400 ग्रॅम वजनाचे बाळ पुण्यात जगले आणि वाढले; 94 दिवसांच्या मुक्कामानंतर 2130 ग्रॅम वजनासह निरोगी बाळ घरी गेले

24 आठवड्यांच्या वाढीचे 400 ग्रॅम वजनाचे पुण्यामध्ये जन्मलेले बाळ आता सात महिन्यांचे झाले. ही भारतातील अशी पहिलीच अशी घटना आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 12, 2023
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र
400-gram-baby-lived-and-grew-up-in-Pune

Photo : 400 gram baby lived and grew up in Pune


24 आठवड्यांच्या वाढीचे 400 ग्रॅम वजनाचे पुण्यामध्ये जन्मलेले बाळ आता सात महिन्यांचे झाले. ही भारतातील अशी पहिलीच अशी घटना आहे. बेबी अंजली (नाव बदलले आहे) हिचा 21 मे 2022 रोजी चिंचवड, पुणे येथील नर्सिंग होममध्ये अकाली जन्म झाला, तेव्हा ती केवळ 400 ग्रॅम वजनाची आणि 30 सेमी लांबीची होती.

जन्माच्या वेळी, आईचे गर्भधारणेचे वय 24 आठवडे होते. जे सामान्य परिस्थितीत 37.40 आठवड्यांच्या दरम्यान असते. तथापि, अकाली जन्म झाल्यामुळे उद्भवू शकणाऱ्या आरोग्यविषयक गुंतागुंत समजून घेऊनही, बाळाच्या पालकांनी बाळाला वाचवण्याचा निर्धार केला आणि बाळाला, वाकड येथील, सूर्या मदर आणि चाइल्ड सुपर या विशेष रुग्णालयातील, तिसर्‍या स्तराच्या एनआयसीयू सेटअपमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. ( 400 gram baby lived and grew up in Pune healthy baby went home with weight of 2130 grams after 94 days of stay )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नवजात तज्ज्ञ आणि नवजात अतिदक्षता विभागाच्या एनआयसीयू परिचारिकांच्या टीमने बाळाच्या जन्माच्या काही तासांतच प्रसूतीगृहातून त्यांच्या इथे बाळाला आणले. बाळाच्या अपूर्ण वाढ असलेल्या अवयवांचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते, ज्यासाठी बाळाच्या जीवितासाठी, कृत्रिम आधाराची आवश्यकता होती. बाळाचे वजन केवळ 400 ग्रॅम असल्याने, अवयवांच्या मदतीसाठी उपलब्ध उपकरणांमध्ये सूर्या हॉस्पिटलमधील निओनॅटोलॉजिस्टच्या तज्ज्ञ टीमने बाळाचे वजन आणि त्याच्या नाजूक त्वचेला अनुसरून आवश्यक ते बदल केले, तसेच ट्यूबच्या आकाराची खात्री करून, प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या नलिका, कॅथेटर इत्यादींचा सुयोग्य वापर केल्याने, बाळाला कोणतीही हानी झाली नाही.

सध्या आरोग्य सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या जीवनावश्यक तंत्र आणि पायाभूत सुविधा ह्या मोठ्या आकाराच्या बाळांना आधार देण्यासाठी बनवलेल्या असून अकाली जन्मलेल्या बाळांसाठी अनुकूल नसल्याने हे काम मोठे कठीण आव्हान होते. हे प्रकरण या रुग्णालयातील आणि देशातील पहिलेच सर्वात अनोखे प्रकरण आहे. ज्यामध्ये, गर्भधारणेचा काळ, बाळाचे वजन, अपरिपक्व अवयव आणि श्वासोच्छवासाची समस्या, दीर्घकालीन फुफ्फुसाचा आजार, ऍनेमिया, तसेच अकाली जन्मामुळे उद्भवणारा श्‍वासोच्छवासास अडथळा आणि डोळ्यांच्या समस्या, यांसारख्या बाळावर परिणाम करणार्‍या अनेक गंभीर समस्या, ज्यामुळे वैद्यकीय टीमचे काम आणखी कठीण झाले होते.

हेही वाचा – मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, अचानक हार घेऊन पुढे आला व्यक्ती आणि… पाहा व्हिडिओ

या प्रकरणातील आव्हाने आणि दुर्मिळतेवर प्रकाश टाकताना डॉ. सचिन (संचालक नवजात आणि बालरोग अतिदक्षता सेवा) यांनी असे सांगितले की, भारतात रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा आणि उपकरणे ही 40 आठवडे किंवा त्याहून अधिक काळाच्या योग्य गर्भधारणेच्या कालावधीत जन्मलेल्या बाळांसाठी तयार केली जातात. त्यामुळे, अकाली प्रसूतीच्या प्रकरणांमध्ये, उपचारांची दिशा अधिक आव्हान बनते. तर अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणांमधून शिकण्याची संधी दडलेली असते. गेल्या 10 वर्षांत आम्ही 400 मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना घरी पाठवले आहे. परंतु बेबी अंजलीने हे सिद्ध केले की चमत्कार शक्य आहे. ( 400 gram baby lived and grew up in Pune healthy baby went home with weight of 2130 grams after 94 days of stay )

तथापि, सर्व समस्यांवर मात करीत 94 दिवसांच्या वास्तव्यानंतर 2.13 किलोग्रॅम वजनाच्या बेबी अंजलीला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. हे बाळ सध्या डॉ. सचिन शाह यांच्या बाह्यरुग्ण देखरेखीखाली आहे आणि आता ते सात महिन्यांचे स्वस्थ आणि निरोगी आहे तसेच त्याला आरोग्याची कोणतीही समस्या नाही. सूर्या हॉस्पिटलने, योग्य वेळेवर बाळाच्या घेतलेल्या वैद्यकीय काळजीमुळे बाळाचे केवळ जगणेच नाही तर बाळाची संपूर्ण वाढ होणे आणि विकासाच्या मापदंडांची पूर्तता करून ते निरोगी जीवन जगत असल्याचीही खात्री करण्यात, महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अत्यंत नाजूक अवस्थेत जन्मलेल्या अंजलीला वाचवणे ही केवळ सूर्या हॉस्पिटलसाठी अभिमानाची बाब नाही, तर सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय व्यवस्था तसेच महाराष्ट्र राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

अधिक वाचा –

– जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना
– अतिक्रमणविरोधी कारवाईत झालेल्या वादामुळे व्यापाऱ्यांचा बंद, शगुन चौकात ठिय्या आंदोलन


Previous Post

अतिक्रमणविरोधी कारवाईत झालेल्या वादामुळे व्यापाऱ्यांचा बंद, शगुन चौकात ठिय्या आंदोलन

Next Post

मोठी बातमी! जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sharad-Yadav-Passes-Away

मोठी बातमी! जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.