Dainik Maval News : येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल. त्यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. युती, आघाड्या यांची गणिते मांडली जात आहेत. मावळ तालुक्यात देखील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आजपर्यंत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यापुरती मर्यादीत असणारी चर्चा आता आणखीन विस्तारणार आहे, याचे कारण मावळ तालुक्यात काँग्रेस ( आय ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष या पाच पक्षांनी एकत्र येऊन मावळ तालुक्यात आगामी निवडणुका या महाविकासआघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे ठरविले आहे.
याबाबत आज ( दि. 27 ऑक्टोबर ) तळेगाव दाभाडे येथे महाविकासआघाडीच्या या पाचही घटकपक्षांच्या तालुकाध्यक्षांच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना उबाठा चे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. या पाचही पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी मावळात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुक आणि तळेगाव दाभाडे, लोणावळा नगर परिषदांच्या निवडणुका व वडगाव मावळ नगरपंचायतीची निवडणुक या निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढविण्याचे जाहीर केले.
लोकशाहीत विरोधी आवाज असणे आवश्यक आहे, आणि लोकशाही टिकविण्यासाठी विरोधकांचा आवाज टिकविण्यासाठी आम्ही महाविकासआघाडी म्हणून या निवडणुकीत एकविचाराने पाचही पक्ष समोरे जाणार आहेत. जास्तीत जास्त उमेदवार महाविकासआघाडीचे निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, जर सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर आम्ही तालुक्याची निवडणुक बिनिविरोध करण्यासही पाठींबा देऊ, असे वक्तव्य याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान महाविकासआघाडीचे नेते एक्टिव्ह झाल्याने मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण आता अधिक गरम होऊ लागले असून निवडणुकीचे वातावरण रंगतदार अवस्थेत आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हजारोंची गर्दी… दमदार एन्ट्री… बापूसाहेब भेगडे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ! चार पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha
– उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर


