व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुनिल शेळके हे दुसऱ्यांदा आमदारकीच्या रिंगणात उभे आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 28, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Maval Vidhan Sabha Candidate sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुनिल शेळके हे दुसऱ्यांदा आमदारकीच्या रिंगणात उभे आहेत. सुनिल शेळके यांचे संपूर्ण नाव सुनिल शंकरराव शेळके असे असून ते तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथील रहिवासी आहेत. तळेगाव दाभाडे आणि मावळ तालुका हीच सुनिल शेळके यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.

कौटुंबिक माहिती –
सुनिल शेळके यांचे वडील शंकरराव शेळके हे समाजकारणात जोडून आहेत. तर त्यांच्या आई या गृहिणी आहेत. सुनिल शेळके यांच्या सहचारिणी सारिका शेळके या घर – संसार संभाळून सुनिल शेळके यांना राजकीय वाटचालीत मदत करीत आहेत. तर सुनिल शेळके यांना दोन अपत्ये असून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तसेच त्यांना भाऊ, चुलते आणि संपूर्ण मोठा परिवार आहे.

सुनिल शेळके यांचे शिक्षण –
सुनिल शेळके यांचे शिक्षण फक्त दहावी इयत्ते पर्यंत झाले आहे. ते तळेगावमधील परांजपे विद्यालयात शिकले आहेत. सुनिल शेळके यांनी आपल्याला पुढे शिकायचे होते, कॉलेजमध्ये जायते होते, परंतु ते स्वप्नच राहिले असल्याचे आजवर अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे.

राजकीय कारकीर्द –
शेळके कुटुंब हे पूर्वीपासून संघ परिवाराशी जोडलेले आहे. सुनिल शेळके यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी 2019 पूर्वी सुनिल शेळके हे भारतीय जनता पार्टी पक्षातील कार्यकर्ते होते. भाजपातूनच ते लहानाचे मोठे झाले. तसेच त्यांच्या चार पिढ्या राजकारणात भाजपाच्या माध्यमातूनच समोर आल्या आहेत.

सुनिल शेळके यांची चढती राजकीय कारकीर्द –
– 2004 पासून भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत
– 2011 तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत विक्रमी मतांनी नगरसेवक म्हणून निवड
– 2016 तळेगाव दाभाडे नगर परिषदेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड
– 2019 निवडणुकीत 93 हजार मताधिक्यांनी विजयी
– 2024 महायुतीचे उमेदवार म्हणून मावळ विधानसभेच्या रिंगणात

सुनिल शेळके यांनी केलेली कामे –
अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले सुनिल शेळके यांनी मागील पाच वर्षांत जवळपास 4 हजार कोटीचा निधी मावळ तालुक्यासाठी आणला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते, वीजेच्या समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेत. तसेच मावळ तालुक्‍यात दोन उपजिल्हा रुग्णालये उभारून तालुक्यातील आरोग्य समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तहसील कार्यालय, नगर परिषद इमारत आदी प्रश्न मार्गी लावले आहेत. लोणावळ्यात पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा असणारा ग्लास स्कायवॉक सारखा मोठा प्रकल्प त्यांनी तालुक्‍यात आणला आहे.

“महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मावळच्या मायबाप जनतेच्या पाठबळाने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मावळात चार हजार कोटींची कामे आणि शाश्वत विकास हाच अजेंडा घेऊन मतदारांसमोर जात आहे. मायबाप मतदार मला पुन्हा एकदा मावळची सेवा करण्याची संधी देतील, हा मला विश्वास आहे.” – सुनिल शेळके, उमेदवार, मावळ विधानसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश


dainik maval jahirat

Previous Post

विधानसभा निवडणूकीत महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार – खासदार श्रीरंग बारणे

Next Post

शिवसेना, राष्ट्रवादीचं ठरलं.. काँग्रेसची अजूनही चर्चाच ! बापूसाहेब भेगडे यांना ठाकरे आणि पवारांकडून पाठींबा जाहीर । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Uddhav Thackeray Sharad Pawar party announced support to Bapusaheb Bhegde Maval Vidhan Sabha

शिवसेना, राष्ट्रवादीचं ठरलं.. काँग्रेसची अजूनही चर्चाच ! बापूसाहेब भेगडे यांना ठाकरे आणि पवारांकडून पाठींबा जाहीर । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.