व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा

तळेगाव शहर भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसोबत बोलताना आपली भूमिका जाहीर केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 27, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon city BJP announced support to Mahayuti candidate Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांनाच महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, मावळ भाजपाचे प्रमुख नेते तथा माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आणि पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे सोबत इतर काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे जाहीर केले आहेत. तसेच या निवडणूकीत आपण महायुतीच्या उमेदवाराचे नाही तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे तालुक्यातील सामन्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. अशात तळेगाव शहर भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसोबत बोलताना आपली भूमिका जाहीर केली आहे.

तळेगाव शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीलाच आपला पाठिंबा दिला असून आम्हाला पक्षाचा आदेश आला आहे आणि महायुतीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही पक्ष आदेशाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, पक्षाच्या आदेशाचे पालन करून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांचेच काम करणार असल्याचे तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी बाळासाहेब जांभूळकर, रजनी ठाकूर, सुरेश दाभाडे आदी उपस्थित होते.

महायुतीच्या वतीने मावळ विधानसभेसाठी विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या विकास कामांना नजरेसमोर ठेवत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला विरोध करत भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी यांनी पदांचे राजीनामे देत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढविण्याची घोषणा केलेले संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणाऱ्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ही भूमिका मान्य नाही. असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांची महायुती आहे. या महायुतीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आहेत. महाराष्ट्रात देखील महायुतीची सत्ता आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. असे असताना महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नसल्याने पक्षाचा आदेश पाळत तळेगाव शहर भाजपाने महायुतीला मावळात पाठिंबा दिला आहे.

महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांची भेट घेत प्रचाराचे नियोजन करणार असल्याचे संतोष दाभाडे पाटील यांनी यावेळी सांगितले. पक्षाचा आदेश आल्यानंतर आमचे नेते देखील महायुतीचे काम करतील असा आशावाद यावेळी व्यक्‍त करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ विधानसभेत मतदार जनजागृती अभियान, विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज
– दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha

Next Post

मावळ प्रकरणामुळे भाजपाची ‘केडरबेस’ पक्ष ही प्रतिमा डागाळली? भाजपाच्या नेत्यांच्या भूमिकेची राज्यभर होतेय चर्चा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval bjp

मावळ प्रकरणामुळे भाजपाची ‘केडरबेस’ पक्ष ही प्रतिमा डागाळली? भाजपाच्या नेत्यांच्या भूमिकेची राज्यभर होतेय चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.