व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ प्रकरणामुळे भाजपाची ‘केडरबेस’ पक्ष ही प्रतिमा डागाळली? भाजपाच्या नेत्यांच्या भूमिकेची राज्यभर होतेय चर्चा

पक्षनिष्ठा काय असते? किंवा पक्षाचा आदेश कसा मानावा आणि पक्ष शिस्त कशी असते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सध्या मावळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाकडे पाहावं लागेल.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 27, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
maval bjp

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पक्षनिष्ठा काय असते? किंवा पक्षाचा आदेश कसा मानावा आणि पक्ष शिस्त कशी असते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सध्या मावळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाकडे पाहावं लागेल. पक्षाची शिस्त मोडल्याने काँग्रेसने मावळातील ज्येष्ठ नेते माउलीभाऊ दाभाडे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले. दुसरीकडे मावळ विधानसभेची जागा महायुतीत आपल्या वाट्याला न आल्याने मावळ भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पदांचे राजीनामे देत थेट पक्षाच्या निर्णयाला आव्हान दिले. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठींबा जाहीर केला. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा न देता फक्त पदांचा राजीनामा देत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या या नेत्यांवर पक्षाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाहीये, हे विशेष.

मावळच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात एवढी मोठी घटना घडून गेली. मात्र, प्रदेश भाजपाकडून याबाबत अद्याप साधी प्रतिक्रिया देखील आलेली नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या घटनेबाबत साधा चकार शब्द देखील उच्चारण्यात आलेला नाही. दुसरीकडे भाजपाचे जेष्ठ नेते अमित शहा म्हणतात बंडखोरी थांबवा. परंतु, या प्रकरणात पक्षश्रेष्ठी यांची चुप्पी म्हणजे बंड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आतूनच पाठिंबा आहे काय? असा सवाल उपस्थित होताना दिसतो.

राष्ट्रवादी हा महायुतीचा घटक पक्ष आहे. आमदार शेळके हे महायुतीतील उमेदवार आहेत. असे असताना महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केलेल्या ‘राष्ट्रवादी’चे बंडखोर उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मावळ भाजपाने पाठिंबा दिला आहे. त्यासाठी स्थानिक भाजपाच्या माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाची शिस्त मोडत आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई न केल्याने पक्षाची शिस्त फक्त बोलण्यापूरती आहे का? याची चर्चा होऊ लागली आहे.

मावळ भाजपा आणि प्रदेश कार्यकारणी यांच्यात समन्वय होत नाही, तोपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करू नये, अशी भूमिका आमदार शेळके यांनी घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. भेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भेगडे यांच्यासह मावळ भाजपकडून बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय होईल, अशी शक्यता वाटत नव्हती. परंतु, बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करताच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पदांचे राजीनामे देऊन त्यांना पाठिंबा दिला. अर्थात त्यांनी अजून पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही.

ज्या पद्धतीने काँग्रेसने त्वरित पक्षाचे ज्येष्ठ नेते दाभाडे यांचे निलंबन करीत मागच्यांना सावधानतेचा इशारा दिला, तसं धाडस भाजपचे पक्षश्रेष्ठी मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून दाखवतील काय? सद्यस्थितीत तरी, भाजपकडून अशा हालचाली होताना दिसत नाहीत. नैतिकता, सुसंस्कृतपणा, साधनसुचिता, विचाराशी बांधिल असलेला आणि केडरबेस पक्ष म्हणून भाजपची आजपर्यंतची ओळख आहे. मात्र, अशा प्रकरणामुळे भाजपाची असलेली ही ओळख पुसट बनत चालली आहे, अशी कुजबुज राजकीय जाणकारांमध्ये सुरु आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश
– मावळात ‘अपक्ष’ उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा ? लवकरच होणार घोषणा । Maval Vidhan Sabha
– मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ विधानसभेत मतदार जनजागृती अभियान, विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी । Maval Vidhan Sabha


Previous Post

‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा

Next Post

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, वडगावमध्ये सभेची जय्यत तयारी । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bapusaheb Bhegde will file independent candidature in Maval Assembly Constituency

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, वडगावमध्ये सभेची जय्यत तयारी । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.