व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ विधानसभेत मतदार जनजागृती अभियान, विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी । Maval Vidhan Sabha

विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ तालुक्‍यात शाळा व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 27, 2024
in लोकल, ग्रामीण, व्हिडिओ, शहर
Voter Awareness Campaign in Maval Assembly Constituency to increase voting

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ तालुक्‍यात शाळा व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

पवन मावळातील ब्राम्हणोली गावात सोमवारी मतदार जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो; मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबादारी पार पाडा; चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या; आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान, अशाप्रकारे घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढत मतदान विषयी जनजागृती केली.

भेटकार्ड वाटप करून मतदान विषयी जनजागृती –
मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. गहुंजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता पोक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात पालकांनी मतदान करावे, यासाठी प्रोत्साहनपर मतदानाची घोषवाक्ये असलेली भेटकार्ड तयारी केली होती. ही भेटकार्ड नागरिकांना वाटून त्यांच्यात मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.

देहूरोड येथे मतदान जनजागृती मोहीम –
मावळ विधानसभेत कमी मतदान होत असलेल्या मतदान केंद्रावर मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार देहूरोड परिसरामध्ये ज्येष्ठ नागरीक कट्टा, बँक, रिक्षा प्रवासी, भाजी मंडई आदी सार्वजनिक ठिकाणी शिक्षकांनी जाऊन ‘ताई माई मतदानाला चला’ या संकल्पनेतून मतदारांमध्ये जनजागृती केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज
– दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News
– धक्कादायक ! जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक, पैसे परत न देता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी


dainik maval jahirat

Previous Post

मावळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात । Maval Vidhan Sabha

Next Post

मावळात ‘अपक्ष’ उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा ? लवकरच होणार घोषणा । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
There is discussion that Mahavikas Aghadi will support independent Bapu Bhegde in Maval Constituency

मावळात ‘अपक्ष’ उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा ? लवकरच होणार घोषणा । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.