व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विधानसभा निवडणूकीत महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार – खासदार श्रीरंग बारणे

शंकर जगताप, अण्णा बनसोडे सोमवारी अर्ज भरणार, महेश लांडगे मंगळवारी अर्ज भरणार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 28, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Chinchwad Pimpri Bhosari Vidhan Sabha Shankar Jagtap Anna Bansode Mahesh Landge will fill nomination

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : चिंचवड विधानसभा मतदारसंघ, पिंपरी विधानसभा मतदारसंघ, भोसरी विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकारी, कार्यकर्ता समन्वय बैठक आणि पत्रकार परिषद रविवारी (दि.27) पार पडली. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, अश्विनी जगताप, अमर साबळे आदी मान्यवर, पदाधिकारी, तसेच महायुतीचे इतर नेते उपस्थित होते.

राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासात्मक मुद्दे घेऊन विधानसभा निवडणुकीला महायुती एकजुटीने सामोरे जात आहे. जनता महायुतीच्या मागे आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रो, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न महायुतीने मिटवले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र असून एकदिलाने निवडणुका लढून जिंकणार असल्याचा निर्धार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

योगेश बहल यांनी सांगितले की, पिंपरी विधानसभेतून आमदार अण्णा बनसोडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी इच्छुक असणाऱ्या इतर व्यक्तींची नाराजी दूर करून अण्णा बनसोडे यांच्यासह महायुतीतील चिंचवड विधानसभेचे उमेदवार शंकर जगताप, भोसरी उमेदवार आमदार महेशदादा लांडगे या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.

चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार राज्यातून आणि शहरातील तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप सह सर्व घटक पक्ष एकत्रित काम करीत आहेत. त्याला त्या सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा आणि वेग आणखी वाढवण्याचे व्हिजन आहे. पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशातच नव्हे तर जगात उंचावण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, यासाठी जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

सदाशिव खाडे यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे सोमवारी तर भोसरी विधानसभेचे आमदार व उमेदवार महेशदादा लांडगे मंगळवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती खाडे यांनी यावेळी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश


dainik maval jahirat

Previous Post

गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसासह तरुणाला अटक । Maval Crime

Next Post

उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Candidate sunil shelke

उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.