Dainik Maval News : पुणे रिंग रोडच्या उर्वरित भूसंपदानासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) 500 कोटींचा निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे रिंग रोडच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बैठक घेतली, त्या वेळी भूसंपादन समवन्वयक कल्याण पांढरे, तसेच विविध ठिकाणचे भूसंपादन अधिकारी आदी उपस्थित होते.
पुणे रिंग रोडसाठी लागणार्या जमिनीचे सुमारे 90 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. पूर्व आणि पश्चिम भागांतील सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. त्याकरिता आणि यापूर्वीच्या निवाड्याचा मोबादला देण्यासाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत जमीनमालकांनी संमतीने जमीन दिल्यास पाचपटीने मोबादला दिला जाणार आहे. 15 डिसेंबरनंतर मात्र सक्तीने भूसंपादन केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पूर्व भागातील 143 आणि पश्चिम भागातील 63 हेक्टर म्हणजे 206 हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. उर्वरित सुमारे 1300 हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या क्षेत्राचे निवाडे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे भूसंपादन समन्वय अधिकार्यांनी सांगितले.
पूर्व भागातील पुरंदर, भोर, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यांतील तसेच पश्चिम भागातील खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील काही क्षेत्राचे संपादन करणे बाकी आहे. 15 डिसेंबरपूर्वी संमतीने जमीन देण्याची इच्छा असणार्या जमीनमालकांनी भूसंपादन अधिकार्यांशी संपर्क साधून संमती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ( 500 crores demand from MSRDC for land acquisition of Pune Ring Road Updates )
सध्या काही भूसंपादन अधिकार्यांकडे निवाड्याच्या रकमेपैकी काही रक्कम शिल्लक आहे. मात्र, उर्वरित 206 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निधीची गरज आहे. त्याकरिता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुमारे 500 कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. संबंधित भूसंपादन अधिकार्यांकडे रक्कम जमा करावी, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने या बैठकीत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांना केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी
– जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन । Zakir Hussain Passes Away
– वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज
– महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस