व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची अपडेट : पुणे रिंग रोडच्या भूसंपादनासाठी एमएसआरडीसीकडे 500 कोटींची मागणी । Pune Ring Road

पुणे रिंग रोडच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बैठक घेतली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 16, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

File Image


Dainik Maval News : पुणे रिंग रोडच्या उर्वरित भूसंपदानासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) 500 कोटींचा निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे रिंग रोडच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बैठक घेतली, त्या वेळी भूसंपादन समवन्वयक कल्याण पांढरे, तसेच विविध ठिकाणचे भूसंपादन अधिकारी आदी उपस्थित होते.

पुणे रिंग रोडसाठी लागणार्‍या जमिनीचे सुमारे 90 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. पूर्व आणि पश्चिम भागांतील सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. त्याकरिता आणि यापूर्वीच्या निवाड्याचा मोबादला देण्यासाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत जमीनमालकांनी संमतीने जमीन दिल्यास पाचपटीने मोबादला दिला जाणार आहे. 15 डिसेंबरनंतर मात्र सक्तीने भूसंपादन केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पूर्व भागातील 143 आणि पश्चिम भागातील 63 हेक्टर म्हणजे 206 हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. उर्वरित सुमारे 1300 हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या क्षेत्राचे निवाडे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे भूसंपादन समन्वय अधिकार्‍यांनी सांगितले.

पूर्व भागातील पुरंदर, भोर, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यांतील तसेच पश्चिम भागातील खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील काही क्षेत्राचे संपादन करणे बाकी आहे. 15 डिसेंबरपूर्वी संमतीने जमीन देण्याची इच्छा असणार्‍या जमीनमालकांनी भूसंपादन अधिकार्‍यांशी संपर्क साधून संमती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ( 500 crores demand from MSRDC for land acquisition of Pune Ring Road Updates )

सध्या काही भूसंपादन अधिकार्‍यांकडे निवाड्याच्या रकमेपैकी काही रक्कम शिल्लक आहे. मात्र, उर्वरित 206 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निधीची गरज आहे. त्याकरिता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुमारे 500 कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. संबंधित भूसंपादन अधिकार्‍यांकडे रक्कम जमा करावी, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने या बैठकीत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी
– जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन । Zakir Hussain Passes Away
– वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज
– महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज

Next Post

न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू… परभणीतील घटनांचा लोणावळ्यातील भीमसैनिकांकडून तीव्र शब्दात निषेध । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
In Lonavala Vanchit Bahujan Aghadi Party protested incidents in Parbhani

न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू... परभणीतील घटनांचा लोणावळ्यातील भीमसैनिकांकडून तीव्र शब्दात निषेध । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.