मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी “मागेल त्याला मोफत झाड” या उपक्रमांतर्गत सुमारे 5 हजार फळ, फुल व सावली देणा-या झाडांचे वाटप मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव नगरपंचायत गेली तीन वर्षांपासून माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात सक्रीय सहभाग घेत असून संपूर्ण वडगाव शहरांमध्ये वृक्षारोपण तसेच स्वच्छतेसाठी विविध उपक्रम व उपाययोजना राबविण्यात येत असतात. ( 5000 trees distributed free of charge to citizens by Morya Pratishthan in Vadgaon Maval )
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका पूनम जाधव, पूजा वहिले, अतुल वायकर, उपाध्यक्षा चेतना ढोरे, सिद्धेश ढोरे, गणेश जाधव, यशवंत शिंदे आदींसह मोरया प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक सदस्य, वडगाव नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि वडगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील नागरिकांनी आपापल्या परिसरात वृक्षसंवर्धन वाढीसाठी झाडे लावणे काळाची गरज असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील नागरिकांना आंबा, नारळ, फणस, चिकू, जांब, पेरू, बदाम, जांभूळ, बकुळ, ताम्हण, सोनचाफा, बेल, कदंब, कडुनिंब, आवळा इत्यादी पाच ते सहा फूट उंचीची झाडे विनामूल्य वाटप केली जातात.
अधिक वाचा –
– वरसोली शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र एरंडे यांचा ग्रामस्थांकडून कृतज्ञतापूर्वक निरोप समारंभ, नव्या मुख्याध्यापिकेंचेही स्वागत
– ‘सर्व्हर डाऊन’मुळे मावळ तहसील कार्यालयाकडून दाखल्यांची दिरंगाई; हेलपाटे मारुन विद्यार्थी मेटाकुटीला