अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये 1 लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75 हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. (5605 Anganwadi employees will get lump sum benefit Announcement by Minister Aditi Tatkare)
हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – अजित पवार
मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– माळवाडी गावच्या उपसरपंचपदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024
– अमृत भारत योजनेअंतर्गत लोणावळा, चिंचवड आणि देहूरोड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन
– मोठी कारवाई! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त