Dainik Maval News : कुंडमळा ( ता. मावळ ) येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर खडबडबन जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने पुणे जिल्ह्यातील सर्व पुलांचे ऑडिट केले. हे ऑडिट पूर्ण झाले असून त्याचा अहवाल समोर आला आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या निर्णयानंतर जिल्ह्यातील एकूण 627 उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले. यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अतिधोकादायक असे काही पूल पाडले जाणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण 627 उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले असून यातील 63 उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत आढळले आहेत. हे सर्व पूल आता पाडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या धोकादायक पुलांची डागडुजी न करता ते थेट पाडून तिथे नवीन पूल बांधण्याचे नियोजन करावे, असा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
एकूण 80 पेक्षा अधिक उड्डाणपूलांमध्ये डागडूजी व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आवश्यक निधीची तरतूद, यंत्रणा आणि मनुष्यबळ याबाबत योग्य ती तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे पुणे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून अशा दुर्घटनांना रोखण्याची दिशा निर्माण होईल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा