Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवानाधारकांची 63 पिस्तुले पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी जमा केली आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांनी ही पिस्तूल परत करण्यात येणार आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकाच्या मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकेतील उमेदवारांचे निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक काळामध्ये पिस्तूल बाळगणे अथवा सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाण्यास प्रशासनाची मनाई आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशान्वये देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकुण 69 परवानाधारक पिस्तूल धारकापैकी बँकेचे तीन वगळता तर 3 लष्कराच्या त्यांच्या स्वतः कडील परवानाधारक पिस्तूल त्यांच्या लष्कर कोर्टामध्ये जमा केल्याचे प्रमाणपत्र व 63 जणांचे पिस्तूल पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्याकडे जमा करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– बापूसाहेब भेगडे हे मावळातील जनतेचे उमेदवार, त्यामुळे परिवर्तन अटळ – रामदास काकडे
– रेशन दुकानदारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित ; धान्यवाटप सुरू राहणार