व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजपाचे कार्यकर्ते काम करतील ; सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास

तालुक्यातील दहशत व दमदाटी विरोधात जनता रस्त्यावर उतरेल ; वडगाव येथे शनिवारी प्रचाराचा शुभारंभ

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 1, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
sunil-shelke-bala-bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मावळातील भाजपाचे कार्यकर्ते महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचेच काम करतील, असा विश्वास मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आरपीआय स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचे काम करून राज्यात चुकीचा पायंडा पाडू नका, असे आवाहनही त्यांनी विरोधात काम करणाऱ्या भाजप नेत्यांना केले.

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे त्यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वडगाव मावळ येथे झालेल्या सभेत विरोधकांनी केलेले सर्व आरोप आमदार शेळके यांनी फेटाळून लावले. महाआघाडी पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज भरताना वक्त्यांनी अत्यंत बेताल व वैयक्तिक बदनामी करणारी वक्तव्य केली, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह आहे. लोकशाहीने सर्वांना भाषण स्वातंत्र्याचा अधिकार‌ दिला आहे. पण त्याचा गैरवापर वक्त्यांनी केल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज का भरला, याबाबत काहीही न बोलता बहुतेक सर्व वक्त्यांनी केवळ सुनील शेळकेला लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आमदार शेळके यांनी केला.

वडगाव मावळ येथे महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार शेळके बोलत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, भरत येवले, एकविरा देवस्थानचे विश्वस्त दीपक हुलावळे, भाजप नेते देवीदास कडू, सुरेश दाभाडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे आदी उपस्थित होते.

तर उमेदवारी अर्ज मागे घेईन – शेळके
मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भाजप कार्यकर्त्यांना स्पष्ट करतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संयुक्त बैठक झाली. महायुतीत उमेदवारीवरून तेढ असलेल्या मतदारसंघांमध्ये समन्वयासाठी या बैठकीत प्रयत्न करण्यात आले. मावळातून मला व बाळा भेगडे यांना बोलावण्यात आले होते. मी पोहोचण्यापूर्वी आधी १० मिनिटे फडणवीस व बाळा भेगडे यांच्यात चर्चा झाली. आमदार शेळके यांनी भाजपच्या तिकिटावर लढावे, असे आम्ही सांगत होतो, मात्र त्यांनी न ऐकल्याने बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे बाळा भेगडे यांनी फडणवीस यांना सांगितले, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

मावळातील भाजप कार्यकर्त्यांना महायुतीबरोबर राहावे लागेल, असे फडणवीस यांनी बाळा भेगडे यांना ठणकावून सांगितले. शेळके यांच्याबरोबर असलेले सर्व वाद विसरून एकत्र या, अशी सूचनाही केली. त्यावर बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी दोन दिवसांची वेळ मागून घेतली. भाजप कार्यकर्त्यांसमोर महायुती बरोबर काम करण्याची भूमिका स्पष्टपणे मांडा तसेच महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराच्या व्यासपीठावर जाऊ नका, असा स्पष्ट आदेश फडणवीस यांनी दिला होता, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे बाहेर माध्यम प्रतिनिधींना दोघांनी मिळून सांगा, अशी सूचना फडणवीस यांनी केली होती, प्रत्यक्षात भेगडे माध्यम प्रतिनिधींना टाळून तेथून निघून गेले, असे शेळके यांनी सांगितले.

मैत्रीपूर्ण लढतीबाबत गौप्यस्फोट –
तोडगा निघत नाही अशा मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या पर्यायावरही बैठकीत चर्चा झाली होती. भाजपच्या नेत्यांनी रवींद्र भेगडे यांना भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासही सांगितले. त्यालाही मी सहमती दर्शवली होती, असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला. त्यांनी उमेदवारी अर्ज बरोबर एबी फॉर्म जोडला की नाही माहित नाही, असेही ते म्हणाले. मावळातून कमळ निवडून आले काय किंवा घड्याळ निवडून आले काय, महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. कमळ निवडून आले तरी मला आनंदच होईल, मात्र महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या उमेदवाराला कदापि निवडून येऊ देणार नाही, असे शेळके म्हणाले.

कार्यकर्त्यांना दमदाटीची ‘ऑडिओ क्लिप’ –
महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या गुंडांकडून दमदाटीचे फोन जात आहे, असा आरोप करीत आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. खेडोपाड्यात अपरात्री २-३ वाजता कोणाच्याही घरात जाऊ नका. कोणालाही दमदाटी करू नका, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. हे प्रकार थांबले नाहीत तर या दहशती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठेल, मावळची जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शेळके यांनी दिला.

शनिवारी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ –
जनतेच्या विश्वासावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शनिवारी वडगाव मावळ येथे ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शेळके यांनी दिली. सध्या भाजपचे कार्यकर्ते दबून आहेत, मात्र चार तारखेनंतर ते सर्वजण खुलून प्रचारात उतरतील, असा दावा शेळके यांनी केला.

‘मावळ पॅटर्न’ हा चार कुटुंबांपुरता मर्यादित असून ठराविक लोकांविरुद्ध संपूर्ण जनता अशी ही लढाई असून आपण एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही आडनावाच्या विरोधात ही निवडणूक नाही. पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मते मागणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध, 6 उमेदवारांचे अर्ज बाद ; पाहा बारा उमेदवारांची नावे आणि पक्ष
– चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime
– नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार मावळ तालुक्याच्या राजधानीची शोभा !


dainik maval jahirat

Previous Post

अंध नागरिकांच्या वृद्धाश्रमात फराळ वाटप, लहानग्यांचा स्तुत्य उपक्रम । Lonavala News

Next Post

देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील परवानाधारकांकडून 63 पिस्तूले जमा । Dehu Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu-Road-Police-Station

देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील परवानाधारकांकडून 63 पिस्तूले जमा । Dehu Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.