पुणे जिल्ह्यात मागीलवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 445 शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 14 लाख 21 हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी 13 लाख 64 हजार रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. ( 73 Crore 60 Lakh Compensation To Farmers Affected By Heavy Rains In Pune District Including 114 Farmers In Maval Taluka )
सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्यातील बाधित गावे, शेतकरी, बाधित क्षेत्र व नुकसान भरपाई खालीलप्रमाणे;
- बाधित गावे – 7
- शेतकरी – 114
- क्षेत्र – 24 हेक्टर
- नुकसान भरपाई – 3 लाख 26 हजार
मार्चमधील अवकाळीमुळे नुकसानभरपाईसाठी 70 लाख रुपये अनुदान मागणी
पुणे जिल्ह्यात मार्च 2023 मधील अतिवृष्टीमुळे एकूण 84 गावातील 1 हजार 434 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. एकूण 408.94 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतीपिके व फळपिकांच्या नुकसानीपोटी 70 लाख 70 हजार रुपये अनुदान मागणी केली आहे.
अधिक वाचा –
– वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात
– बेबडओहोळ गावात घरोघरी येणार जलगंगा; तब्बल 4 कोटी 91 लाखाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन