Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवन मावळ ( Pawan Maval ) विभागातील प्रमुख पवना धरणात ( Pavana Dam ) आजमितीस (दि. 23 जुलै) 78.87 टक्के इतका पाणीसाठा आहे. पवन मावळात पावसाचा जोर ( Rain Updates ) काहीसा ओसरला आहे, त्यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान पवना धरणाच्या बॅकवॉटर भागात मात्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून यामुळे धरणात नित्याने काही प्रमाणात पाण्याचा येवा हा सुरू आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील अनेक गावे ही पवना धरणाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. गावखेड्यातील शेती, अनेक लहान मोठे उद्योग धंदे यांच्याकरिता पवना धरण जलाशय हे पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. अशात सद्यस्थितीत पवना धरण 78.87 टक्के भरल्याने आणि पावसाचे पुढील दोन महिने बाकी असल्याने या भागातील नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे.
बुधवार, दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरण क्षेत्रात मागील 24 तासात 29 मि.मी. इतका पाऊस झाला, यासोबत 1 जूनपासून झालेल्या पावसाची एकूण आकडेवारी ही 1459 मि.मी. इतकी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 49.30 टक्के इतका पाणीसाठा होता, गतवर्षीच्या मानाने यंदा पवना धरण लवकर भरले असून सद्यस्थितीत धरणात 78.87 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी ‘दैनिक मावळ’शी बोलताना दिली.
पवन मावळ हा अधिक पर्जन्यमान असलेला भाग आहे. या भागात शेतीसाठी अधिक पावसाची गरज असते. सद्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही लवकरच पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो पाऊस जसा शेतीसाठी फायदेशीर ठरेल, तसाच पवना धरण 100 टक्के भरून वर्षभराची पाण्याची चिंताही मिटेल, अशी सर्वांना आशा आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा