व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रीय लोक अदालतीत 78 हजार प्रलंबित दावे निकाली, पुणे जिल्हा सलग नवव्यांदा राज्यात प्रथम

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 78 हजार 206 प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 13, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Lok-Adalat

File Image


प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 78 हजार 206 प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. सतत नवव्यांदा जिल्ह्याने दावे निकाली काढण्यातील प्रथम स्थान कायम ठेवले आहे.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली 1 हजार 277, तडजोड पात्र फौजदारी 7 हजार 819, वीज देयक 247, कामगार विवाद खटले 7, भुसंपादन 118, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण 125, वैवाहिक विवाद 217, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट 1 हजार 525, इतर दिवाणी 674, महसूल 203, पाणी कर 61 हजार 990, ग्राहक विवाद 6 आणि इतर 3 हजार 998 प्रकरणे अशी एकूण 78 हजार 206 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ( 78 Thousand Pending Claims Settled In Pune District In National Lok Adalat Became Number One In State )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 2 लाख 24 हजार 516 दाव्यापैकी 13 हजार 795 दावे निकाली काढण्यात येऊन 70 कोटी 72 लक्ष 4 हजार 426 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व 1 लक्ष 96 हजार 8 प्रलंबित प्रकरणांमधून 64 हजार 411 प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात 46 कोटी 83 लक्ष 78 हजार 384 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण 78 हजार 206 प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन 117 कोटी 56 लाख 22 हजार 810 रुपये लक्ष रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

लोकअदालतीच्या माध्यमातून विभक्त झालेले संसारही जोडले गेले आहेत. घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या 6 जोडप्यांनी समुपदेशनानंतर परत एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक जोडपे गेल्या 15 वर्षापासून वेगळे रहात होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांच्या न्यायालयात हे प्रकरण निकाली काढण्यात आले तर इतर पाच प्रकरणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चिंतामण शेळके यांच्या न्यायालयात निकाली निघाले.

हेही वाचा – दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! आता प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर वर्गात आल्यास ‘नो एन्ट्री’

सह दिवाणी न्यायाधीश जागृती भाटिया यांनी दोन प्रकरणात वयोवृद्ध व्यक्ती असल्याने दुरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी घेतली. जिल्हा न्यायधीश भूषण क्षीरसागर यांच्या पॅनलवर 113 मोटार अपघात प्रकरणात विविध विमा कंपन्यांकडून गरजूंना नुकसान भरपाई मिळाली. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजेंद्र तांबे यांच्या पॅनलवर घेण्यात आलेल्या 1825 प्रकारणांपैकी 118 जमीन अधिग्रहण प्रकरणे निकाली काढण्यात येऊन 11 कोटी 95 लाख 39 हजार रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली. ( 78 Thousand Pending Claims Settled In Pune District In National Lok Adalat Became Number One In State )

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेल्या 8 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 9 लाखापेक्षा जास्त दाखल असलेली आणि दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. पुढील राष्ट्रीय लोकअदालत शनिवार 30 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

अधिक वाचा –

– महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रपतींनी 12 राज्यांचे राज्यपाल आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले, पाहा यादी
– नील सोमय्यांच्या उपस्थितीत वडगावात माफक दरात श्रवणयंत्र वाटप, शहर भाजपा आणि युवक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम


dainik maval jahirat

Previous Post

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! आता प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर वर्गात आल्यास ‘नो एन्ट्री’

Next Post

भीषण अपघात! इंजिनाच्या धडकेत 4 रेल्वे कामगार जागीच ठार, महाराष्ट्र हळहळला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Railway-Accident

भीषण अपघात! इंजिनाच्या धडकेत 4 रेल्वे कामगार जागीच ठार, महाराष्ट्र हळहळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.