Dainik Maval News : वडगाव मावळ येथील खंडोबा चौकात जय मल्हार ग्रुप च्या वतीने नवरात्र महोत्सव 2024 निमित्त महिला वर्गासाठी लोकप्रिय असा ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात जवळपास 900 महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात पुजा शिंदे यांनी मानाची पैठणी पटकाविली आहे.
यासह वनिका उनवणे यांनी सोन्याची नथ, सोनम बोरसे यांनी चांदीचा छल्ला जिंकला. उत्तेजनार्थ पारितोषिक दुर्गा पवार, ज्योती महागरे, अन्वी दळवी यांना देण्यात आले. प्रत्येक सहभागी महिलेला यावेळी विशेष भेटवस्तू देखील देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहित गुरव यांनी केले.
शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, माजी नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, माजी नगरसेवक मंगेश खैरे, माजी नगरसेविका पुजा वहिले, माजी उपसरपंच विशाल वहिले, संतोष खैरे, सौरभ सावले, अफताब सय्यद, तुषार वहिले, सोनु पिंजण, संदिप ढोरे, शैलेश खैरे, शंकर साकोरे, विराज वहिले, स्वप्निल वाघमारे, नितीन जाधव, शंकर सुतार, रतिश वाघमारे, संतोष देशमुख, अभिषेक ढोरे, लौकिक सासवडकर, योगेश साकोरे आदी पदाधिकारी – कार्यकर्ते आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला ‘त्याचा’ शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !
– ‘मी दुर्गा’ बेस्ट सेल्फी आणि रिल्स स्पर्धेतील विजेत्या प्रतिभा थोरात यांचा सन्मान । Vadgaon Maval
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही