Dainik Maval News : देहू नगरपंचायतीचे ९७ कोटी, ९९ लाख, ६७ हजार ५४५ रुपयांचा २०२५ – २६ चा वार्षिक अर्थसंकल्पीय आर्थिक अंदाजपत्रकास स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मंगळवारी (दि. १८) विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम,नगराध्यक्ष पूजा दिवटे,उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, लेखपाल केशव पिनाटे,कर विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे यांसह नगरसेवक,नगरसेविका,अधिकारी उपस्थित होते.
- लेखपाल केशव पिनाटे यांनी देहू परिसरातील विकास कामातील अंदाज अर्थसंकल्पीय पुढील प्रमाणे मांडले आहे. कर महसूल, अभिहस्तांकित महसूल आणि भरपाई, महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसहाय, मालमत्ता पासून उत्पन्न, फी वापरकर्ता आकार आणि द्रव्यदंड, विक्री व भाडे आकर,व्याजापासून उत्पन्न समवहत ठेवी अथवा ना परतावा ठेवी व इतर उत्पन्न असे सुमारे २४ कोटी ,२८लाख ८९ हजार रुपयांचे महसुली उत्पनाचा अंदाजपत्रक मांडला.
आस्थापना, प्रशासकीय,व्याज व वित्त आकार,मत्तांच्या दुरुस्त्या व परिरक्षण ,व्यवहार आणि कार्यक्रम अंमलबजावणी याकरता खरेदी,घसारा,महसूल अनुदाने अंशदाने आणि अर्थसहाय्य,तरतुदी आणि निलेखित करणे,राखीव निधी आणि संकीर्ण खर्च असा सुमारे २० कोटी,१८ लाख,५ हजार रुपयांचा अंदाजे खर्च होणार असल्याची मांडले.
भांडवली खर्चातुन विकास कामावर होणारा अंदाजीत खर्च मांडताना इमारत व जागा ,भूसंपादन करणे, रस्ते,पूल, पाणीपुरवठा नवीन जलवाहीनी टाकणे, गटारे व नाले, भुयारी ड्रेनेज लाईन टाकणे,घनकचरा डम्पिंग ग्राउंड विकसित करणे,सार्वजनिक शौचालय अथवा प्रसाधनगृह बांधकाम करणे, संयंत्र व यंत्रसामग्री, वीज संचमांडणी,स्मशानभूमी विकास,फर्निचर, प्रधानमंत्री आवास योजना ,इतर स्थिर मत्ता यांवर सुमारे ७७ कोटी,७९ लाख ,५० हजार होणार असल्याचा अंदाजपत्रक मांडला आहे.
अर्थसंकल्पातील वैशिष्टे
सुमारे ४३ कोटींची नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना, १० कोटींची भुयारी गटार दुरुस्ती योजना,देहू शहर चा विकास आराखडा पूर्ण करणे,स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी करणे.दिव्यांग तसेच दुर्बल घटक कल्याण निधीची तरतूद करणे ,महिला व बालकांकरता स्वसंरक्षण, योगा,आरोग्य प्रशिक्षण उभारणी,प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी करणे. नदी संवर्धन व सुभीकरण अंतर्गत तरतूद करणे.नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी टाकणे.नदी घाट सुशोभीकरण करणे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News