व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी महत्वाची बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कान्हे ग्रामपंचायतीचे कौतूक

इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 9, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
indrayani-river

file image


इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या उपाययोजनांना गती देऊन त्या कालबद्ध रितीने पूर्ण कराव्यात. या उपाययोजनांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तिथे तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. याबैठकीला स्वतः जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाचे अधिकारी, लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषद आणि देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नारायण शिंदे, वारकरी डी. डी. भोसले पाटील आदी उपस्थित होते. ( meeting to prevent Indrayani river water pollution )

‘इंद्रायणी नदी हा सर्वांच्या आस्थेचा, प्रथा, परंपरा, श्रद्धेचा विषय असून नदीमध्ये प्रदुषित सांडपाणी येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलपणे याकडे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व नगरपरिषदांनी आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा घालून त्याप्रमाणे कामाला गती देणे आवश्यक आहे,’ असे जिल्हाधिकारी म्हटले.

‘लोणावळा नगरपरिषदेच्या एसटीपीच्या अनुषंगाने रेल्वे क्रॉसिंगबाबत परवानगीसाठी गतीने पाठपुरावा करण्यात येईल. तळेगाव येथील कार्यान्वित न होऊ शकलेल्या एसटीपीचा क्षमतावाढीचा आराखडा तयार करावा. देहू नगरपंचायतीनेही अल्पमुदतीच्या उपाययोजना तात्काळ पूर्ण कराव्यात. आळंदी येथील एसटीपी विहित कालमर्यादेत पूर्ण करावा,’ असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत”

‘मावळ तालुक्यातील कान्हे ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सांडपाण्यावर अभिनव पद्धतीने प्रक्रिया करुन त्याचा गावातच पुनर्वापर केल्यामुळे नदीमध्ये अजिबात सांडपाणी सोडले जात नाही. कान्हे गावाने केलेल्या उपाययोजना जिल्हा परिषदेने इतरही गावात राबवून नदीत सोडले जाणारे सांडपाण्याचा पुनर्वापर करावा. तसेच नदीकाठच्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये 100 टक्के शोषखड्ड्यांचा उपक्रम राबवावा,’ असे जिल्हाधिकारी म्हणाले.

‘सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता, जलप्रदुषण रोखणे आदीच्या अनुषंगाने दरमहा उपक्रम राबवावेत. त्यात शाळा, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सहभाग वाढवावा. सांडपाणी प्रकल्प आराखडे, उभारणी, निधी आदींच्या अनुषंगाने आवश्यक ते तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक मदत उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. नदी पुनुरुज्जीवनाच्या उपाययोजनांमध्ये पीएमआरडीएलाही सहभागी करुन घेण्यात येईल,’ असेही यावेळी डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या.

अधिक वाचा –
– तळेगाव शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री
– वडगाव शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार


Previous Post

शेतकरी मित्रांनो…! फसवणूक टाळण्यासाठी बियाणे आणि खते खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्या, नक्की वाचा

Next Post

डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक, सात गुन्ह्यांची उकल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक, सात गुन्ह्यांची उकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.