व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक, सात गुन्ह्यांची उकल

क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 9, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Crime

File Photo : Crime


क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली. या आरोपींनी यापूर्वी कासारसाई येथे देखील एका दुचाकीस्वार महिलेला मारहाण करून तिचे दागिने चोरून नेले होते.

बुद्धदेव विष्णू बिश्वास (वय 24, रा. पश्चिम बंगाल), मिंटू मिहीर बिश्वास (वय 26, रा. भोसरी, पुणे. मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ( accused arrested for robbing woman doctor by throwing chilli powder in eyes )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी एक महिला दवाखान्यातून उपचार घेऊन दुचाकीवरून घरी जात होती. ती कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्याजवळ आली असता एका व्यक्तीने महिलेला अडवून तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने चोरून नेले. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2022 रोजी 26 वर्षीय डॉक्टर तरुणी तिच्या क्लिनिकमध्ये असताना दोघांनी क्लिनीकमध्ये घुसून डॉक्टर तरुणीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले.

या गंभीर घटनांची दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेने या प्रकरणांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. आरोपी प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांना जिकरीचे झाले होते. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. 7 जून रोजी दोन्ही आरोपी हिंजवडी परिसरात आले असल्याची माहिती पोलीस अंमलदार तुषार शेटे आणि प्रशांत सैद यांना मिळाली.

हेही वाचा – महत्वाची बातमी! जमीन एनए परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला, जाणून घ्या

त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार केली. हिंजवडी परिसरात सापळा लाऊन दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी कासारसाई आणि हिंजवडी येथील क्लिनिकमधील महिलांना लुटले असल्याची कबुली दिली. दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, शिरगाव, तळेगाव दाभाडे आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक एक गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. या कारवाईमुळे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक फौजदार दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, आदिनाश मिसाळ, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मद गौस रफिक नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.

अधिक वाचा – 
– तळेगाव शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री
– दारूंब्रे सोसायटी चेअरमनपदी यादव सोरटे आणि वाऊंड सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी महत्वाची बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कान्हे ग्रामपंचायतीचे कौतूक

Next Post

‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’, शरद पवारांना सोशल मीडियावर धमकी, राष्ट्रवादी आक्रमक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sharad-Pawar

'तुमचा लवकरच दाभोळकर होणार', शरद पवारांना सोशल मीडियावर धमकी, राष्ट्रवादी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.