काही महिन्यांपूर्वी बोरघाटात झालेल्या बस अपघातानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातप्रवण भागात अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून खंडाळा बोरघाट इथे दस्तुरी गावाच्या हद्दीतील मॅजिक पॉइंट इथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीकडे जाणाऱ्या आणि खोपोलीहून लोणावळ्यात येणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला.
ज्या ठिकाणी जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जोडला गेलाय, तिथे मॅजिक पॉइंट आणि अंडा पॉइंटजवळ ‘हाइट बॅरिकेड’ बसवण्यात आले. त्यामुळे येथून अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी केली गेली. परंतू असे असतानाही काही आगाऊ वाहनचालक इथूनच बळेच वाहन नेण्याचा आगाऊपणा करतात आणि त्यामुळे लहान मोठे अपघात घडत असतात.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
असाच एक प्रकार आज (शनिवार, दिनांक 10 जून ) रोजी घडला. एक छोटा हत्ती प्रकारातील टेम्पो या ठिकाणाहून उंची बसत नसतानाही वाहनचालकाने घुसवला आणि तिथेच अडकून पडला. याप्रकारामुळे काहीवेळ वाहतूकीवर परिणाम झाला. प्रशासनाने लवकर वाहन बाजूला काढले, परंतू यातून पुन्हा एकदा वाहनचालकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. ( tempo accident due to getting stuck in height barricade at khandala ghat on mumbai pune highway )
खरेतर, हे असे अपघात घडण्याचे कारण म्हणजे तसेच 80 टक्के वाहतूक ही खोपोली मध्ये उरून पनवेल / कर्जत / बदलापूर / कल्याण अशी जाणारी असते. त्यामुळे ते वाहनचालक जबरदस्ती या मार्गाचा वापर करतात. अशा वाहन चालकांना पोलीस कर्मचारी, महामार्गावर सुरक्षा कामे नियुक्त असलेले कर्मचारी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते रस्ता बंद असल्याचे किंवा ते वाहन जाणार नाही, असे सांगत असतात तरीही सुचनेकडे दुर्लक्ष करत वाहन घुसवतात. त्यामुळे असे अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांनी येथून जाण्याचा अट्टहास टाळणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
– शरद पवार यांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांसमोरच घोषणा
– महत्वाची बातमी! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल, लगेच वाचा