आमदार सुनिल शेळके यांनी पवन मावळ भागातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी केली. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार शेळकेंनी विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवन मावळातील सोमाटणे-शिरगाव, सोमाटणे-परंदवडी, धामणे-गोडुंब्रे, बेबडओहोळ-आढले, पिंपळखुटे-शिवणे, कामशेत-काले कॉलनी, बौर-उर्से, बौर-सडवली या रस्त्यांची कामे सध्या सुरु आहेत. या कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आमदार शेळकेंनी पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या सुचना व समस्या जाणून घेतल्या. तसेच रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या. यावेळी उपअभियंता धनराज दराडे, कनिष्ठ अभियंता राजेसाहेब आगळे आणि संबंधित ठेकेदार, ग्रामस्थ उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke inspected development works of pavan maval area )
यासह, पवन मावळमधील गहुंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव या पवना नदीवरील नवीन पुलांच्या कामाचा आमदार शेळकेंनी आढावा घेतला. या पुलांसाठी सुमारे 57 कोटी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. थुगाव व कडधे येथील पुलांची कामे 70 टक्के पूर्ण झाली असून सदर पुल नागरिकांना वाहतूकीसाठी लवकर खुले व्हावेत, यासाठी कामांना गती द्यावी, अशा सूचना आमदार महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिक वाचा –
– टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान । आषाढी वारी 2023
– श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान