मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा यांच्यावर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांकडून विजय सुराणा यांची मावळ तालुका सरपंच परिषदेचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष एॅड विकास जाधव यांनी विजय सुराणा यांना नियुक्तीचे पत्र दिले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही ग्रामविकास, ग्रामपंचायत व त्या अनुशंगाने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांसाठी राज्यात कार्यरत आहे. मागील अनेक वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेले विजय सुराणा हे दैनिक लोकमतचे कित्येक वर्षांपासून प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. यासह सामाजिक क्षेत्रातही ते नेहमी अग्रेसर असतात. ( Vijay Surana appointed as Maval Taluka Contact Head by Sarpanch Parishad Mumbai Maharashtra )
पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रश्न शासन दरबारी मांडून ग्रामीण भागाला नेहमीच न्याय देण्याची महत्वपुर्ण भुमिका पार पाडत असतात. त्यांच्या या भुमिकेकडे पाहून ग्रामीण भागाच्या विकासाचे शिलेदार म्हणून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांकडून त्यांची मावळ तालुका सरपंच परिषदेचे संपर्क प्रमुख या पदावर नियुक्ती केली आहे.
हेही वाचा – मान्सून आला रे…!! राज्यातील कोट्यवधी नागरिक आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, लगेच वाचा । Monsoon Update
मावळ तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची एकत्रित मोठ परिषदेच्या माध्यमातून बांधणे, तसेच सरपंच परिषदेच्या ध्येय धोरणांनुसार कार्यरत राहून सभासद नोंदणी आणि सरपंच परिषदेचे संघटन संपुर्ण तालुक्यात तसेच जिल्ह्यात वाढवण्यासाठी योगदान देणे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून परिषदेला आहे.
अधिक वाचा –
– श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
– अजिवली ग्रामपंचायतमधील विकास कामांचे भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन