नुकताच इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळ युवा आघाडी यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ( ssc and hsc meritorious students felicitated by maval taluka kumbhar samaj mandal )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कुंभार समाजातील लोणावळा, कामशेत, शिळीम, कोथुर्णे, साते, टाकवे, वडेश्वर, माऊ, तळेगाव दाभाडे या गावांमधील दहावी व बारावी परिक्षा उत्तीर्ण अशा 32 विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचा घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळाचे युवा अध्यक्ष जयंत कुंभार, मंडळाचे वरिष्ठ मार्गदर्शक संतोष कुंभार, विनायक कुंभार, अनिकेत कुंभार, आकाश शिवलीकर, मनोहर भालेराव, तुषार नाणेकर, अथर्व दरेकर, राहुल माऊकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मान्सून आला रे…!! राज्यातील कोट्यवधी नागरिक आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, लगेच वाचा । Monsoon Update
– “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”