तळेगाव दाभाडे : इंद्रपुरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रविवारी (दिनांक 11 जून) करण्यात आले. या कार्यक्रमाला महेश शेंडकर, उद्योजक निलेश राक्षे, चंद्रकांत दाभाडे, गणेश थिटे, नारायण मालपोटे तसेच सोसायटीतील रहिवासी नागरिक उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या इंद्रपुरी कॉलनीत 110 भूखंड आहेत. यामध्ये 13 रहिवासी सोसायट्या असून 35 भूखंडावर फार्म हाऊस, रो हाऊस, हॉटेल, कंपन्या आहेत. इतर 11 ठिकाणी विविध कामे सुरु आहेत. येथील रहिवासी सोसाट्यांमधील सुमारे दोनशे सदनिकांमध्ये सुमारे दोन हजार नागरिक राहत आहेत. ( development works inauguration by mla sunil shelke in Indrapuri Colony talegaon dabhade )
मागील सहा वर्षांपासून हे रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित होते. येथील रहिवाशांच्या समस्यांकडे प्रशासन व बिल्डर्स यांनी डोळेझाक केल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. सोसायटी धारकांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कॉलनीतील बंदिस्त गटार बांधणे तसेच सुमारे एक कोटी वीस लक्ष निधीतुन ग्रीन व्हीव सोसायटी ते साईसिद्धी सोसायटी रस्ता,अपेक्स सोसायटी ते बोध क्लासिक सोसायटी रस्ता, महामार्ग ते लक्ष्मी सोसायटी रस्ता, हॉटेल थंडा मामला मागे इंद्रपुरी सोसायटी रस्ता, ग्रीन व्हीव ते प्रथमा हाईट्स सोसायटी रस्ता, अपेक्स सोसायटी ते लक्ष्मी आंगण सोसायटी रस्ता, महामार्ग ते अपेक्स सोसायटीकडे जाणारा रस्ता अशा एकूण सात रस्त्यांची कामे पावसाळ्यापुर्वी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.
“सोसायटी धारकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मागील दोन वर्षांत इंद्रपुरी कॉलनीतील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावू शकलो, याचे समाधान आहे.” – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– तळेगावातील विविध विकासकामांचे चंद्रकांत पाटलांच्या हस्ते भूमिपूजन; दिवंगत नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या वॉर्डात 1.53 कोटींचा निधी
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव शहरात रक्तदान शिबिर, 76 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग । Vadgaon Maval