व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘इंद्रपुरी’तील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण । MLA Sunil Shelke

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या इंद्रपुरी कॉलनीत 110 भूखंड आहेत. यामध्ये 13 रहिवासी सोसायट्या असून 35 भूखंडावर फार्म हाऊस, रो हाऊस, हॉटेल, कंपन्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 12, 2023
in लोकल, शहर
sunil-shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


तळेगाव दाभाडे : इंद्रपुरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रविवारी (दिनांक 11 जून) करण्यात आले. या कार्यक्रमाला महेश शेंडकर, उद्योजक निलेश राक्षे, चंद्रकांत दाभाडे, गणेश थिटे, नारायण मालपोटे तसेच सोसायटीतील रहिवासी नागरिक उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या इंद्रपुरी कॉलनीत 110 भूखंड आहेत. यामध्ये 13 रहिवासी सोसायट्या असून 35 भूखंडावर फार्म हाऊस, रो हाऊस, हॉटेल, कंपन्या आहेत. इतर 11 ठिकाणी विविध कामे सुरु आहेत. येथील रहिवासी सोसाट्यांमधील सुमारे दोनशे सदनिकांमध्ये सुमारे दोन हजार नागरिक राहत आहेत. ( development works inauguration by mla sunil shelke in Indrapuri Colony talegaon dabhade )

मागील सहा वर्षांपासून हे रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित होते. येथील रहिवाशांच्या समस्यांकडे प्रशासन व बिल्डर्स यांनी डोळेझाक केल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. सोसायटी धारकांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कॉलनीतील बंदिस्त गटार बांधणे तसेच सुमारे एक कोटी वीस लक्ष निधीतुन ग्रीन व्हीव सोसायटी ते साईसिद्धी सोसायटी रस्ता,अपेक्स सोसायटी ते बोध क्लासिक सोसायटी रस्ता, महामार्ग ते लक्ष्मी सोसायटी रस्ता, हॉटेल थंडा मामला मागे इंद्रपुरी सोसायटी रस्ता, ग्रीन व्हीव ते प्रथमा हाईट्स सोसायटी रस्ता, अपेक्स सोसायटी ते लक्ष्मी आंगण सोसायटी रस्ता, महामार्ग ते अपेक्स सोसायटीकडे जाणारा रस्ता अशा एकूण सात रस्त्यांची कामे पावसाळ्यापुर्वी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.

“सोसायटी धारकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मागील दोन वर्षांत इंद्रपुरी कॉलनीतील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावू शकलो, याचे समाधान आहे.” – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– तळेगावातील विविध विकासकामांचे चंद्रकांत पाटलांच्या हस्ते भूमिपूजन; दिवंगत नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या वॉर्डात 1.53 कोटींचा निधी
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव शहरात रक्तदान शिबिर, 76 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात खुल्या गटातील मुला-मुलींची वेटलिफ्टींग स्पर्धा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-sinhagad-express

अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.