व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंद वारी । दिवेघाटात योग साधकांकडून हजारो वारकऱ्यांच्या पायांना मसाज, थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांमध्ये भरले चैतन्य

योग विद्याधाम पिंपरी चिंचवडतर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने योगसाधक मसाज करुन देतात. एकावेळी साधारण 50 महिला व 50 पुरुष वारकऱ्यांचा मसाज होतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 15, 2023
in पुणे, महाराष्ट्र, शहर
ashadhi-wari-2023

Photo Courtesy : Jivraj Chole


दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज करून त्यांच्यात चैतन्य भरण्याचे काम होते. या आगळ्यावेगळ्या मसाज सेवेने वारकरी सुखावतात व उत्साहाने पुढे मार्गस्थ होतात.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

योग विद्याधाम पिंपरी चिंचवडतर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने योगसाधक मसाज करुन देतात. एकावेळी साधारण 50 महिला व 50 पुरुष वारकऱ्यांचा मसाज होतो. यंदा या वारीत सहा ते सात हजार वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगगुरू प्रमोद निफाडकर आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश केकाने, ऐश्वर्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी मसाज सेवा गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे. ( ashadhi wari 2023 foot massage for warkari who climbed divghat by yoga vidyadham )

हेही वाचा – ‘श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे’ यांच्या वतीने ‘श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच’चे वाटप । Wari 2023

प्रमोद निफाडकर म्हणाले, “शेकडो किलोमीटरची पायी वारी करताना पाय थकतात. अशावेळी वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून देण्याची संकल्पना आमच्या कार्यकर्त्यांनी मांडली आणि हा उपक्रम सुरु झाला. पुणे-सासवड हा लांबचा पल्ला; त्यातही दिवेघाटाची अवघड वाट चालून वर आल्यावर मन आनंदी असले, तरी पायांना थकवा येतो. मसाज करून पाय मोकळे करावेत आणि मानसोबत पायही त्याच आनंदाने पुढे चालावे, या उद्देशाने ही सेवा देत आहोत. पांडुरंगाची चरणसेवा केल्याची अनुभूती आम्हाला मिळते.”

हेही वाचा – महत्वाची बातमी! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल, लगेच वाचा

सुरेश केकाणे म्हणाले, “शंभर ते दीडशे योगसाधक ही सेवा देतात. वारकऱ्यांना यातून सुखद आनंद मिळतो. वारीत पाण्यासह भोजन, औषधे, खाद्यपदार्थ व अन्य गोष्टी मिळतात. पण अशी अनोखी सेवा दिवेघाटातून वर आल्यावर मिळते, असे वारकरी आवर्जून नमूद करतात.”

हेही वाचा – “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”

ऐश्वर्या जोशी म्हणाल्या, “वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून सेवेचा निखळ आनंद आम्ही घेतो. हजारो माउलींच्या पायांना मसाज करण्याचा हा आनंद आम्हाला शेवटपर्यंत घेता यावा, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो.”

अधिक वाचा –
– सततच्या पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शिंदे सरकारकडून 1500 कोटींचा निधी मंजूर
– मोठी बातमी! राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पवनमावळातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर


dainik maval jahirat

Previous Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या जन्मदिनी देहूरोड शहर शाखा कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

ह्याला म्हणतात स्वागत..!! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांची बैलगाडीतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
welcoming-students

ह्याला म्हणतात स्वागत..!! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांची बैलगाडीतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.