महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना सन-2023 अंतर्गत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून वडगाव नगरपंचायत विद्युत विभागाच्या विविध कामांसाठी तब्बल 2 कोटी 79 लाख रुपयांच्या विकास निधी कामाची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. ( fund sanctioned to vadgaon nagar panchayat for various works of electricity department )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहराचे वाढते शहरीकरण ही बाब लक्षात घेऊन, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना सन -2023 अंतर्गत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे माध्यमातून आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून वडगाव नगरपंचायत विद्युत विभागाच्या कामासाठी 2 कोटी 79 लाख रुपयांच्या विकास निधी कामाची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी माध्यमांना दिली.
अधिक वाचा –
– चिखलसे ग्रामपंचायतमधील विविध विकासकामांचे बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन
– मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच