व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणातून 15 दिवसात 22 हजार क्युबिक मीटर गाळ काढला, पाणीसाठ्यात मोठी वाढ

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने पवना धरणातून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 19, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
pavana-dam-maval

Photo Courtesy : Twitter / MP Shrirang Barne


मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने पवना धरणातून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

मागील सात वर्षांपासून हे गाळ काढण्याचे काम दरवर्षी केले जाते. यावर्षी आतापर्यंत तब्बल 22 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. धरणातील गाळ शेतक-यांना शेतात टाकण्यासाठी उपयोगी पडत आहे. त्यामुळे शेतक-यांनाही फायदा होत असल्याचे खासदार बारणे म्हणाले. ( on initiative of maval mp shrirang barane silt removed from pavana dam )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दिनांक 19 जून) पाहणी केली. शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, माजी सभापती शरद हुलावळे, युवा सेना अध्यक्ष विशाल हुलावळे, युवा सेना उपाध्यक्ष नितीन देशमुख, अमित कुंभार, दिनेश ठाकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले. परंतु, धरणातील साठवण क्षमता वाढविण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. त्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून धरणातील पाण्याची क्षमता वाढण्यासाठी मागील सात वर्षांपासून गाळ काढला जात आहे. आत्तापर्यंत 76 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. त्यामुळे धरणातील साठवण क्षमतेत वाढ झाली आहे.

गाळ काढल्यामुळे पाणीसाठा अधिकचा राहत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांवरील पाणीसंकट टळले. धरणातून काढलेला गाळ शेतक-यांना दिला जातो. पवना धरण परिसरात नर्सरी, फळबागांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी गाळाचा उपयोग केला जातो. त्यामुळे शेतक-यांना देखील फायदा होतो. गाळ घेऊन जाणा-या चालकांनी डंपरच्या क्षमतेपेक्षा जास्त गाळ भरुन वाहतूक करु नये. गावक-यांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी गाळ घेऊन जाणा-यांना केल्या.

माझ्या पुढाकारातून पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने गेली सात वर्ष पवना धरणातून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मागील १५ दिवसात धरणातून तब्बल २२ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. आज पवना धरणातील गाळ काढण्याच्या या कामाची पाहणी केली.

मागील सात वर्षापेक्षा यंदा… pic.twitter.com/5QfqyHhVYt

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) June 19, 2023

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पवना धरणातील गाळ काढण्याचे काम मागील सात वर्षांपासून चालू आहे. पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव दाभाडे, एमआयडीसीच्या क्षेत्राला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात या धरणात आजुबाजूच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात गाळ येतो. त्यामुळे पाणी साठण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यापार्श्वभूमीवर सात वर्षांपासून धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. कोरोनामुळे दोन वर्ष गाळ काढला नाही. यंदा पुन्हा परवानगी घेऊन गाळ काढण्याचे काम सुरु आहे. धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेची मदत न घेता सामाजिक संस्था, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मदतीने गाळ काढला जात आहे. मागील सात वर्षात धरणातून 76 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे.”.

पवना नदीच्या स्वच्छतेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार

पवना नदीपासून पिंपरी-चिंचवड शहरापर्यंत नदीत येणारे नाले आणि नदीत मिसळणारे अशुद्ध पाणी थेट नदीत येऊ नये यासाठी एसटीपी प्लांट बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले जावे, यासाठी खासदार श्रीरंग बारणे सातत्याने संबंधित कंपन्या आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. खासदार श्रीरंग बारणे हे पवना नदीच्या स्वच्छतेसाठी चांगले काम करत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे शासन आपल्या दारी या उपक्रमात बोलताना केला होता.

अधिक वाचा –
– राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन
– तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या साळुंब्रे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न


Previous Post

खासदार श्रीरंग बारणेंच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे वाटप; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

Next Post

साहेब…हे कधी थांबणार?? सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत वडगाव राष्ट्रवादीचे महावितरण कंपनीला निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-ncp

साहेब...हे कधी थांबणार?? सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत वडगाव राष्ट्रवादीचे महावितरण कंपनीला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.