व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणेंच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे वाटप; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगाना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 19, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
shirrang-barne-maval

Photo Courtesy : FB / Shrirang Barne


दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगाना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. केंद्रीय सामाजिक मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या मान्यतेने खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम थेरगाव येथे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल आणि खालापूर या सहा विधानसभा मतदारसंघात या साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दिनांक 16 जून) थेरगाव येथे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग बांधवास इलेक्ट्रिक सायकल दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील 271 लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले जाणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून गरजू दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप केले जात आहे.

लोकसभा सदस्यांना एका टर्ममध्ये एकदाच अशाप्रकारे साहित्याचे वाटप करता येते. खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील टर्म मध्ये दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वाटप केले होते. त्याचप्रमाणे आता पुन्हा साहित्याचे वाटप केले जाणार आहे. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासदार श्रीरंग बारणे करीत असतात. तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहून त्यांची कामे मार्गी लावल्यावर त्यांचा भर असतो.

दिव्यांगांच्या विविध संघटनांना विश्वासात घेऊन साहित्य वाटपाचे काम केले जात आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या या उपक्रमाला दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंधांसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट भांडे आणि इतर साहित्य देण्यात आले. बुधवारी (दि. 21) पनवेल, गुरुवारी (दि. 22) कर्जत, खालापूर व उरण आणि शुक्रवारी (दि. 23) मावळ येथे हा उपक्रम राबविला जाणार आहे. ( necessary materials distributed to disabled through maval lok sabha constituency mp shrirang barane )

अधिक वाचा –
– तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या साळुंब्रे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न
– राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन


Previous Post

मावळ तालुक्यातील एकमेव आयटीआय संस्थेला आमदार शेळकेंची भेट; विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

Next Post

पवना धरणातून 15 दिवसात 22 हजार क्युबिक मीटर गाळ काढला, पाणीसाठ्यात मोठी वाढ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pavana-dam-maval

पवना धरणातून 15 दिवसात 22 हजार क्युबिक मीटर गाळ काढला, पाणीसाठ्यात मोठी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.