बंदी असतानाही गोमांसाची बेकायदा वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, गुन्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव फाट्यावर पोलिसांनी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कारवाईत, आरोपींकडून एक टँकर आणि मोटारीसह सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शाहीद कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही) व योगेश रोहिदास गोरडे (वय 34, दोघेही रा. जुन्नर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ( vadgaon maval police arrested two people in case of beef transportation )
पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरडे घेऊन जाणारा दुधाचा टँकर मंगळवारी (दिनांक 20 जून) पहाटे पावणे दोनच्या सुमारास वडगाव-तळेगाव फाटा येथे पकडला. ज्याच गाय व बैलाचे मांस आढळून आले. त्यानंतर गोरक्षकांनी पाठलाग करून मुंढावरे फाटा येथे पकडलेल्या मोटारीतही गाय व बैलाचे मांस आढळून आले. ते कामशेत पोलिसांच्या मदतीने वडगाव पोलिस ठाण्यात जमा केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून दोघे पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक सस्ते पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– साहेब…हे कधी थांबणार?? सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत वडगाव राष्ट्रवादीचे महावितरण कंपनीला निवेदन
– राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन