श्रीक्षेत्र पिठापुरम (आंध्र प्रदेश) येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानमधील श्री दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका आणि रथयात्रेचे रविवारी (दिनांक 18 जून) रोजी मावळ तालुक्यातील गहुंजे गावात जल्लोषात आगमन झाले.
ही रथयात्रा दिनांक 15 जून ते 24 जून दरम्यान सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी या मार्गाने जाणार आहे. खास बाब म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यात दिनांक 18 जून रोजी श्री पादुका आणि रथयात्रा यांचा फक्त मावळ तालुक्यातच मुक्काम होता. ( shri dattaguru first avatar sripad srivallabh paduka and chariot grand welcomed in gahunje village in maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गहुंजेकरांनी अत्यंत भक्तीभावात आणि जल्लोषात पादुका आणि रथयात्रेचे स्वागत केले. पादुका आगमनाच्या दिवशी संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीची शोभा वाढवण्यासाठी पुण्याचा प्रसिद्ध प्रभात बँड आणि शिवणे गावातील ढोल पथक होते.
रविवारी सायंकाळी नामस्मरण झाले आणि भजन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद आणि दर्शनाची सर्व व्यवस्था बजरंग दल आणि स्वयंसेवक भक्त यांनी केली होती.
सोमवारी (दिनांक 19 जून) रोजी सकाळी काकडआरती झाल्यानंतर पादुकांचा महाअभिषेक पार पडला. यानंतर पुन्हा भजन झाले आणि दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महासंस्थानचे पुजारी सुभाष गुरू व्यवस्थापक श्री दास गुरू, श्रीनिवास गुरू आदी उपस्थित होते. यासह पुणे जिल्ह्यातील हजारो दत्तभक्तांनी या सोहळ्याला उपस्थिती दाखवली होती. प्रदीप बोडके यांनी दैनिक मावळला ही माहिती दिली.
अधिक वाचा –
– गोमांस वाहतूकप्रकरणी दोनजण ताब्यात; पहाटेच्या सुमारास पोलीस आणि गोरक्षकांची संयुक्त कारवाई । वडगाव मावळ
– मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच