चांदेकरवाडी धरणाजवळ हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लावलेल्या भट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. रविवारी (दिनांक 18 जून) रोजी ही कारवाई करण्यात आली. असिफ शेख (वय 28, रा. विकासनगर, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिस अंमलदार निखिल पाटील यांनी याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आढले खुर्द गावात चांदेकरवाडी धरणाच्या बाजूला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. ( shirgaon police raided village liquor manufacturing factory near Chandekarwadi dam in maval taluka )
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– तोतया नौदल अधिकाऱ्याचा पर्दाफाश, दोन साथीदारांसह गजाआड; लोणावळा शहर आणि INS शिवाजी नेव्हल पोलिसांची कारवाई
– अंगावर काटा आणणारी बातमी..! आढले गावातील एकाच घरात सापडली घोणस सापाची तब्बल 20 पिल्ले