व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उमा खापरे, बाळा भेगडेंच्या उपस्थितीत लोणावळ्यात भाजपाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘व्यापारी संमेलन’ संपन्न

यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदार उमा खापरे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना मार्गदर्शन केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 22, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
maval-loksabha-bjp

Photo Courtesy : Jitendra Botre


मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे व्यापारी संमेलन लोणावळा शहरातील मॅपल रिसॉर्ट इथे यशस्वीपणे पार पडले. मावळ मतदारसंघात मोदी@9 सेवा, सुशासन व गरिब कल्याण या अजेंड्यानुसार महा-जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती मोदी @9 मावळ लोकसभेचे व्यापारी संमेलन संयोजक जितेंद्र बोत्रे यांनी दैनिक मावळला दिली. ( BJP Maval Lok Sabha Constituency business meeting Vyapari Sammelan Held in Lonavala City )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदी सरकारचे ऐतिहासिक निर्णय, विविध विकास कामे आणि जनहितार्थ सुरु असलेल्या अनेक योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, याकरिता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महा-जनसंपर्क अभियान आणि मोदी @9 अभियान सुरु आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेतील व्यापाऱ्यांचे ‘व्यापारी संमेलन’ लोणावळा शहरात मावळ लोकसभाचे समन्वयक संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदार उमा खापरे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना मार्गदर्शन केले. तसेच महामंडळ अध्यक्ष अमित घोडके, भाजपा महिला आघाडी – मावळ तालुका अध्यक्ष सायली बोत्रे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, प्रदेश सचिव वर्षा डहाळे आदींनी मनोगत व्यक्त केली.

हेही वाचा – मोदी@9 : भाजपाचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंच्या उपस्थितीत ‘घर घर मोदी’ अभियानाचा वडगाव शहरात प्रारंभ

कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, तळेगाव शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निर्मल ओसवाल, सागर शर्मा, सुभाष सिंगल, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव माळसकर, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, मा जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र माने, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस अविनाश बवरे यांसह व्यापारी सहकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( BJP Maval Lok Sabha Constituency business meeting Vyapari Sammelan Held in Lonavala City )

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे व्यापारी संमेलनाचे संयोजक विशाल वाळुंजकर, मावळ विधानसभा मतदारसंघाचे व्यापारी संमेलनाचे संयोजक नामदेव कोंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चिंचवड विधानसभा मतदार संघाचे संयोजक राजेंद्र चिंचवडे यांनी मानले.

अधिक वाचा –
– कौतुकास्पद! शिवशंभो प्रतिष्ठानकडून जवण येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
– ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदाराची मागणी, केंद्रीय मंत्र्यांना दिले निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Next Post

धरणाजवळ हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर शिरगाव पोलिसांचा छापा । Maval Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

धरणाजवळ हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर शिरगाव पोलिसांचा छापा । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.