व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 22, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठीचा राज्य सरकारचा हिस्सा लवकर देण्यात येईल. हा प्रकल्प केंद्र, राज्य शासनाच्या महारेल कंपनीच्या माध्यमातून हाती घेवून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती मिळेल असा विश्वास मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खासदार बारणे यांनी गेले तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा करुन पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. कामाला गती देण्यासाठी राज्य सरकार, रेल्वे, महारेलच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. एमआरव्हीसीचे सीएमडी सुभाष गुप्ता, विलास वाडेकर, बी.के.झा, रुता चिग्सन, रेल्वेचे सुरेश पाखरे आदी उपस्थित होते. ( Work on third and fourth tracks on Pune Lonavala Railway to start soon CM Eknath Shinde approved )

खासदार बारणे म्हणाले, केंद्र सरकारने 2014-15 मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यासाठी 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. परंतु, डीपीआर तयार करताना त्याचा खर्च 2100 कोटी होता. 2022 मध्ये खर्च 2200 कोटी रुपयांवर गेला. आता साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा खर्च गेला आहे. त्यात जागा भूसंपादनासह सर्व कामाचा समावेश आहे. याचा 50 टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि 50 टक्के राज्य सरकार अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या 50 टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे. ट्रॅकचे काम पूर्ण होण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

पुणे ते लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅक संदर्भात माझ्या मागणीवरून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली.

यावेळी सुधारीत डी.पी.आर करण्याच्या सूचना देऊन, या मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या बरोबर बैठक घेतली जाईल असे आश्वासन मा.… pic.twitter.com/dvRLZeNbAo

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) June 21, 2023

केंद्र सरकारकडून रेल्वेचे प्रकल्प हाती घेत असताना त्यात राज्य सरकारने सहभाग दाखविला. तर हे काम वेगात होईल. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प महारेलने हाती घेतला आहे. त्या माध्यमातून तो पूर्ण करण्याच्या हालचाली चालू आहेत. त्याप्रमाणेच पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम महारेलच्या माध्यमातून करावे. तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सोबत बैठक झाली होती. त्यावेळी जोपर्यंत राज्य सरकार सहमती देणार नाही. तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत एकत्रित बैठक घेण्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅक हा प्रकल्प राज्य सरकारच्या महारेलने हाती घेतला. तर तो प्रकल्प वेळेत आणि लवकर पूर्ण होईल. ट्रॅकसाठीचा राज्य सरकारचा सहभाग पूर्ण देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदाराची मागणी, केंद्रीय मंत्र्यांना दिले निवेदन
– ‘किल्ले लोहगडावरील अतिक्रमण हटवा, अन्यथा…’, लोहगड मुक्तीसाठी एकवटले हिंदू बांधव । Lohagad Fort News


dainik maval jahirat

Previous Post

मोदी@9 : भाजपाचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंच्या उपस्थितीत ‘घर घर मोदी’ अभियानाचा वडगाव शहरात प्रारंभ

Next Post

उमा खापरे, बाळा भेगडेंच्या उपस्थितीत लोणावळ्यात भाजपाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘व्यापारी संमेलन’ संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-loksabha-bjp

उमा खापरे, बाळा भेगडेंच्या उपस्थितीत लोणावळ्यात भाजपाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील 'व्यापारी संमेलन' संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.