होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी महिला व बालकांसाठी मोफत विधी सेवा आणि मध्यस्थी चिकित्सालय याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे श्याम चांडक यांच्या हस्ते करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती सोनल पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते. महिलांना व बालकांना मोफत विधी सेवा देण्यासाठी त्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी कक्षाचे उद्घाटन केले आहे. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. ( free legal services and mediation clinic room for women and children by Hope for the Children Foundation )
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार, स्टेशन डायरेक्टर मदनलाल मीना, सहाय्यक कामगार आयुक्त गजानन शिंदे, बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ. राणी खेडीकर, महिला बालविकास अधिकारी श्रीमती कांबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड , होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापिका कॅरोली मॅडम, व्यवस्थापक शकील शेख, डिवाइन जैन संघटनेचे अध्यक्ष संकेत शहा यांच्या उपस्थितीत पार पडला.
तसेच यावेळी बालकामगार विरोधी दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. एम.एस.डब्ल्यू चा विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. उपस्थित सर्वांचे आभार होप फॉर चिल्ड्रेन चे समन्व्यक सूत्रसंचालक ऋषिकेश डिंबळे यांनी मानले.
अधिक वाचा –
– उमा खापरे, बाळा भेगडेंच्या उपस्थितीत लोणावळ्यात भाजपाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘व्यापारी संमेलन’ संपन्न
– कौतुकास्पद! शिवशंभो प्रतिष्ठानकडून जवण येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप