महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील म.पो. केंद्र बोरघाटच्या हद्दीमधील एन.एच. 48 वरील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील वन वे बाजूस असलेल्या खिंडीतील उतारावर व वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने MH-02-ER-8082 या क्रमांकाची बस दरीत पडून झालेल्या अपघातात “बाजीप्रभू झांज पथक” गोरेगाव मुंबई येथील किशोरवयीन मुलांमुलीपैकी 13 जण जागीच मृत्युमुखी पडले होते तसेच 29 जण गंभीर जखमी झाले होते. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. अंडा पॉईंट व मॅजिक पॉईंट या ठिकाणी हाईट बॅरिअर बसविण्याबाबत यापूर्वी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रास्ते विकास महामंडळ यांना कळविण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अपघात घडल्यानंतर मुख्यमंत्री व इतर मंत्री महोदयांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या. तसेच रस्ता सुरक्षा समिती बैठकीमध्ये सुद्धा हाईट बॅरिअर तात्काळ बसविण्याबाबत सूचना केल्याने एम.एस.आर.डी.सी यांनी सूचना केल्याप्रमाणे आय.आर. बी.मुं.पु.द्रुतगती मार्ग प्रा.लि.यांनी अंडा पॉईंट व वाय जंक्शन मंजिक पॉईंट या ठिकाणी ‘हाइट बॅरिकेड’ बसविले आहेत. हे हाईट बॅरिअर बसविल्यानंतर काही मोटार वाहन चालक हे हाईट बॅरिअर उंचीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्यामुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या हाईट बॅरीअरला जोरदार धडक दिल्यामुळे हाईट बॅरिअरचे पूर्णपणे नुकसान झाले. ( Prohibition order issued for movement of heavy vehicles through height barrier at Anda Point and Y Junction Magic Point in Borghat )
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे यांनी अपर जिल्हादंडाधिकारी रायगड, ता.अलिबाग, जि. रायगड यांना पत्र दिले असून जिल्हाधिकारी रायगड यांनी यापूर्वी दि. 30 मे 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार अंडा पॉईंट या ठिकाणी असलेली रिफील लेनची लांबी अपघात प्रवण असल्याकारणाने प्रायोगिक तत्वावर 30 दिवसांकरिता प्रवेश बंद करण्यात आलेली अधिसूचना कायमस्वरुपी जारी करण्याबाबत विनंती केली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी या अधिसूचनेच्या दिनांकापासून (दि.26 जून 2023 रोजीपासून) पुढील आदेश होईपर्यंत खालापूर तालुक्यातील बोरघाट हद्दीतील अंडा पॉईंट व वाय जंक्शन मॅजिक पॉईंट या ठिकाणी असलेल्या 2.5 मीटर उंचीच्या हाईट बॅरिअर उंची पेक्षा जास्त उंचीवरील वाहनांना वाहतूक बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री.संदेश शिर्के यांनी कळविले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट? पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 2 आरोपींना अटक । Kishor Aware Murder Case
– कामशेत पोलिसांकडून पंडित नेहरू विद्यालयात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यशाळा