एका महिलेचा तिच्या संमतीशिवाय बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी तिचा नवरा आणि बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा पती आणि बिरवाडी (रायगड) येथील एक डॉक्टर यांच्याविरोधात महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Illegal abortion of woman Case registered against husband and doctor )
मुळ तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) येथील महिलेला अगोदर दोन मुली आहेत. परंतू तिला तिसरा मुलगा व्हावा म्हणून पतीने सातारा येथील एका डॉक्टरकडून गर्भलिंग निदान करून घेतले. तेव्हा पत्नीच्या पोटात मुलीचाच गर्भ आढळून आल्याने पतीने पत्नीचा गर्भपात करण्यासाठी 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत तिला महाडमधील बिरवाडीतील एका क्लिनिकमध्ये आणले. त्यानंतर पत्नीची कोणतीही परवानगी नसताना बेकायदा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर महिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आली, परंतू पोटात दुखू लागल्याने पुन्हा तिला पुणे येथील ससून रुग्णालयात ( Sasoon Hospital Pune ) दाखल करण्यात आले. तेव्हा या ठिकाणी तिचा गर्भपात झाला. परंतू संबंधित प्रकरणाचा तपास केल्यानंतर या महिलेचा संमतीशिवाय बेकायदा गर्भपाताचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये महिलेचा पती प्रफुल्ल गुरव आणि डॉ. राजेंद्र केंद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Illegal abortion of woman Case registered against husband and doctor )
अधिक वाचा –
भयानक! अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाचा दारू पाजून अत्या’चार, वरसोली गावातील संतापजनक प्रकार
दसऱ्यानंतर श्री दुर्गामातेने विसर्जित होताना खोपोलीकरांना दिला अत्यंत गंभीर इशारा, वाचा सविस्तर I Khopoli News