व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तर भाजपाला एकही जागा मिळाली नाही. एकंदरीत सर्व पराभवाचा विचार करून मावळ भाजपा नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
bjp-party-flag

file image


Dainik Maval News : दोन विधानसभा निवडणुकीतील पराभव, नगरपंचायत – नगरपरिषदा निवडणुकीत मिळालेले अल्प यश आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झालेला दारुण पराभव यानंतर मावळ भाजपने मोठा निर्णय घेत, तालुक्यात सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त केली आहे. पवनानगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच, आता नव्या कोअर कमिटीत युवा नेतृत्वाकडे तालुक्यात पक्षाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तब्बल 25 वर्षे मावळ विधानसभा, मावळ पंचायत समितीमध्ये सत्ता राहिलेल्या, तसेच लोणावळा नगरपरिषदमध्ये असलेली एकहाती सत्ता राहिलेल्या भाजपाची मागील सहा ते सात वर्षांत कधी नव्हे इतकी पिछेहाट झाली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तर भाजपाला एकही जागा मिळाली नाही. एकंदरीत सर्व पराभवाचा विचार करून मावळ भाजपा नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांच्यासह सर्व सदस्य, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्ष, तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार यांच्या उपस्थितीत मावळ भाजपची विशेष बैठक पवनानगर येथे झाली. तिथेच कोअर कमिटी बरखास्त करणे व नवीन कमिटी नेमणे आदी निर्णय झाल्याचे समजते.

या बैठकीत सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला आलेले अपयश याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दरम्यान, या वेळी कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांनी स्वतःहून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व पक्षाची कोअर कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, कोअर कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेताना नव्या कोअर कमिटीमध्ये तसेच, पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तालुक्यातील तरुणांना सहभागी करून घेण्याचा महत्वाचा निर्णय या वेळी झाला असल्याचे समजते. त्यामुळे मावळ भाजपने झालेल्या पराभवानंतर पक्षाचे अधिकार ज्येष्ठांकडून तरुणांकडे सोपवत एकप्रकारे भाकरी फिरवण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे दिसते.

प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करण्यात येत होती. या बैठकीत पक्षातील गटबाजी, गद्दारांमुळे झालेला पराभव याविषयी विशेष चर्चा झाली. तसेच, अशा गद्दारांवर कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सबंधित गद्दारांची नावे पाठविण्यात आली असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पास मान्यता

Next Post

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade Municipal Council threatens punitive action against those who throw garbage in open

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.