मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या मोदी@9 अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी टाकवे इथे मावळ विधानसभा मतदार संघातील टाकवे पंचायत समिती गणातील बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि या भागातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांची टिफीन बैठक घेतली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 9 वर्षात राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाणे व बूथ स्तरावर मोदी सरकारने राबविलेल्या योजनांचे माहिती पत्रक घरोघरी वाटप करून त्याची जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करणे आणि संघटनात्मक कार्यासंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर, रविंद्र भेगडे यांनी उपस्थितांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले. ( Tiffin Meeting of BJP officials And Workers In Takve Village Maval )
याप्रसंगी मावळ तालुका भाजपा उपाध्यक्ष पुंडलिक खांडभोर, अंदर मावळ भाजपा अध्यक्ष गणेश कल्हाटकर, टाकवे वडेश्वर जिल्हापरिषद गटाचे अध्यक्ष रोहीदास असवले, टाकवे पंचायत समिती गणाचे अध्यक्ष अमोल भोईरकर, कोंडिवडे आंदर मावळचे सरपंच लक्ष्मण तळावडे, विश्वनाथ जाधव, शक्ती केंद्र प्रमुख सचिन पांगारे, रामदास आलम, विकास आसवले, दत्ता असवले, आप्पाजी तूर्डे, बाळासाहेब शिंदे, उपसरपंच राहुल शेटे, संग्राम कदम, संदेश शेलार यांच्यासह टाकवे गणातील सर्व बूथ अध्यक्ष उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘मोदी सरकारचे 9 वर्षातील यश’ निबंध स्पर्धा : हचिंग्ज स्कूलमधील स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे
– विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी आमदार सरसावले; विद्यार्थ्यांना ‘ऑफ लाईन’ पद्धतीने दाखले द्या – आमदार सुनिल शेळके