मावळ : इंदोरी पुलाजवळ इंद्रायणी नदीच्या पात्रात एका युवतीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी सदर महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रज्ञा कौशल भोसले (वय 23, रा. वराळे) असे युवतीचे नाव आहे. मावळ वन्यजीव रक्षक टीम, आपदा मित्र मावळ यांच्या रेस्क्यू टीमने तसेच आंबी एमआयडीसी पोलीस पथकाने युवतीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ही मुलगी पाण्यात कशी पडली, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच ही आत्महत्या आहे की घातपात याचाही शोध घेतला जात आहे. ( Newly married girl dies after drowning in Indrayani river indori maval )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 9 ग्रंथालयांना आमदार स्थानिक विकास निधीतून स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या संचाचे वाटप
– टाकवेत रविंद्र भेगडेंच्या उपस्थितीत बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि विभागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची टिफीन बैठक