व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! शरद पवारांनी दिल्लीत केला मोठा बदल, ‘या’ विश्वासू नेत्याकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. काल रविवारी (दिनांक 2 जुलै) रोजी झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीत अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 3, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Sonia-Doohan

File Image


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. काल रविवारी (दिनांक 2 जुलै) रोजी झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीत अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. यात प्रामुख्याने शिवसेना दुभंगत असताना ज्या ज्या घडामोडी घडल्या तशाच गोष्टी राष्ट्रवादी बाबत होताना दिसत आहेत. ( Sonia Doohan will be charge of Nationalist congress party New Delhi central office Said Sharad Pawar )

राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले होताना दिसत असून यातूनच पक्ष, चिन्ह, नाव आणि कार्यालये यांसह नेते-पदाधिकारी यांना आपल्याकडे खेचण्याची घाई होताना दिसत आहे. यातच मागील अनेक वर्षे दिल्लीचं राजकारण जवळून पाहिलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत एक महत्वाचा बदल केला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शरद पवार यांनी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची जबाबदारी अत्यंत विश्वासू नेत्याकडे सोपवली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक नियुक्ती पत्र पोस्ट करत ही घोषणा केली आहे. त्यानुसार, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जनतेला आणि पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, आजपासून सुश्री सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी दिल्ली मध्यवर्ती कार्यालयाचा कार्यभार सांभाळणार आहेत.” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

It is hereby notified all public and office bearers of NCP that from today Ms. Sonia Doohan will be charge of Nationalist congress party, New Delhi central office.@DoohanSonia pic.twitter.com/qfl7zANwmG

— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 3, 2023

कोण आहेत सोनिया दुहान?

सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. त्यांच्या तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 ला पहाटेच्या शपथविधी वेळी त्यांनी राष्ट्रवादीतील फुट रोखल्याने त्या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू बनल्या.

अधिक वाचा –
– टाकवेत रविंद्र भेगडेंच्या उपस्थितीत बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि विभागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची टिफीन बैठक
– ‘मी उद्यापासून बाहेर पडणार..लोकांमध्ये जाऊन भुमिका मांडणार..पक्षाबद्दल कुणी काही दावा केला तरी भांडत बसणार नाही’ – शरद पवार


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील 9 ग्रंथालयांना आमदार स्थानिक विकास निधीतून स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या संचाचे वाटप

Next Post

धक्कादायक! दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा इंद्रायणीत बुडून मृत्यू, इंदोरी पुलाजवळील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
girl-dies-after-drowning

धक्कादायक! दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा इंद्रायणीत बुडून मृत्यू, इंदोरी पुलाजवळील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.