राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार हे 2 जुलै 2023 रोजी पक्षात बंड करुन आमदारांच्या मोठ्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले. तसेच त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री आणि अन्य आठांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ह्या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यातही मावळ तालुक्याचा राजकारणाला याने मोठा हादरा बसला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याचे कारण भाजपाच्या मिशन-45 मध्ये असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ, राष्ट्रवादीचे आमदार असलेला आणि अजित पवार यांच्या पुत्राने पराभव पाहिलेला मावळ मतदारसंघ या दोघांचाही मावळ लोकसभेवर दावा आहे किंबहूना त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचा हा पारंपारिक मतदारसंघ असून इथे सध्या शिवसेनेचे शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणे हे आहेत. श्रीरंग बारणे हे देखील या मतदारसंघातून तिसऱ्यांदा इच्छुक असून त्यांचाही या मतदारसंघावर दावा आहे.
त्यामुळेच सत्तेत असणाऱ्या तिनही पक्षाचा दावा असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ कुणाच्या पारड्यात जाणार आणि इथले राजकीय गणित कसे असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. परंतू असे असले तरीही मागील अनेक महिन्यांपासून तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्न करणारे श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा आपणच लोकसभेसाठी युतीचे उमेदवार असणार आणि निवडणूक लढवणार असा शड्डू ठोकला आहे. ( MP Shrirang Barne Has Announced His Candidacy For Maval Lok Sabha Constituency Election 2024 )
2019 च्या निवडणूकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेच्या निवडणूकीत पराभव झाला होता. त्यात आता अजित पवार हे महायुतीत आलेत. तसेच श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी आमच्या महायुतीत असली तरीही 2024 लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार असणार, असे म्हणत आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचे काय होणार? पार्थ पवारांचं पर्यायाने राष्ट्रवादीचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झालीये, ती महाराष्ट्राने पाहिली आहे. येत्या काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळे मिळून जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल. स्थानिक पातळीवर काम करताना मोठा संघर्ष असतो. तो संघर्ष नाकारुन चालत नाही. मात्र युतीचा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला आहे. त्यानुसार सगळे निर्णय घेतले जाणार आहे. महायुतीतील सगळ्याच पक्षांना एकत्र निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र काहीही झाले तरीही मावळ लोकसभेचा मीच उमेदवार राहणार’, असे श्रीरंग बारणे यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
अधिक वाचा –
– आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील 50 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप
– ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन